भारतीय जनता पार्टी करवीर तालुका अध्यक्षपदी अमित कांबळे यांची निवड
करवीर (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक बांधणीला बळकटी देण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी नवीन जबाबदाऱ्या जाहीर केल्या असून, आज भारतीय जनता पार्टी करवीर तालुका अध्यक्षपदी अमित अरुण कांबळे राहणार पाडळी खुर्द तालुका करवीर यांची निवड करण्यात आली.

ही निवड महाराष्ट्र राज्याचे मंत्री. चंद्रकांतदादा पाटील, राज्यमंत्री. माधुरीताई मिसाळ, खासदार मुन्ना महाडिक, जिल्हाध्यक्ष नाथाजीदादा पाटील तसेच राहुल चिकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
तसेच जिल्ह्यातील वरिष्ठ नेते शिवाजी बुवा, जिल्हा सरचिटणीस मेजर भिकाजी जाधव, चिटणीस अनिल देसाई आणि पदवीधर आघाडी प्रमुख अजितसिंह चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष हंबीरराव पाटील यांच्या सहकार्यामुळे ही जबाबदारी मिळाल्याची भावना नवनियुक्त तालुकाध्यक्षांनी व्यक्त केली.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, “भारतीय जनता पार्टीने माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी प्रामाणिकपणे कार्य करणार असून, पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करणार आहे.”
तसेच ही नवीन जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्ते व ज्येष्ठांचे आशीर्वाद सदैव सोबत राहावेत, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.




