माजी आ. ऋतुराज पाटील यांच्या हस्ते 46 लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ

माजी आ. ऋतुराज पाटील यांच्या हस्ते 46 लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ

कोल्हापूर (प्रतिनिधी) - कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील शुगरमिल, नेहरूनगर, कळंबा फिल्टर हाऊस व संभाजीनगर परिसरात ४६ लाख ६६ हजार निधीतून करण्यात येत असलेल्या विविध विकासकामांचा शुभारंभ माजी आ. ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. 

विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आ. सतेज पाटील यांच्या 15 लाखांच्या निधीतून शुगर मिल परिसरात शाहूनगरी येथे अंतर्गत गटर्स करण्यात येणार आहेत. आ. सतेज पाटील आणि माजी आ. ऋतुराज पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे नेहरूनगर मधील ओपन स्पेसच्या संरक्षक भिंतीसाठी खासदार इम्रान प्रतापगढी यांच्या फंडातून 10 लाख तर कळंबा फिल्टर हाऊस परिसरातील म्हाडा कॉलनीतील ओपन स्पेससाठीही 10 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्याचबरोबर माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या 2024-25 च्या आ. निधीतून संभाजीनगर मधील ताराराणी कॉलनीत रस्ता काँक्रीटीकरणसाठी 11 लाख 66 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या सर्व कामांचा कामाचा शुभारंभ माजी आ. ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. 

याप्रसंगी काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी नगरसेवक हरिदास सोनवणे, भूपाल शेटे, सुभाष बुचडे, दुर्वास कदम, डॉ. संदीप नेजदार, मोहन सालपे, रवी आवळे, फिरोज सौदागर, अजित पोवार, प्रशांत पाटील, जावेद खान, संतोष पाटील, अनंत पाटील, मारुती पाटील, सुनील ताटे, अशोक माळी, प्रसन्न वैद्य, विजय पाटील, प्रवीण सोनवणे, मदन कोथळकर, अनिल शिंदे, रवी गावडे, रवी शिंदे, अनिस शेख, सुमित बामणे, समीर कवठेकर, उमेश पाडळकर, अमोल ओतारी, किशोर यादव, संदीप सरनाईक, युवराज पाटील, योगेश कांबळे, रोहित गाडीवडर, अभिजित चरापले यांच्यासह मान्यवर व नागरिक उपस्थित होते.