माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कागलमध्ये रुग्ण व विद्यार्थ्यांना फळे वाटप
कागल (प्रतिनिधी) - माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कागल येथे रुग्ण व विद्यार्थ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने फळ वाटप करण्यात आली. ग्रामीण रुग्णालयमधील रुग्णांना आणि दिलीपसिंह घाटगे कर्णबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना ही फळे वाटप करण्यात आली.

यावेळी शाहू साखर कारखान्याचे संचालक सतीश पाटील, गोकुळचे माजी संचालक अजितसिंह घाटगे, प्रमोद कदम,सातापा घाटगे, बाळासाहेब माळी, कुंडलीक हिरुगडे,पप्पू कुंभार आदी उपस्थित होते.




