शरद इन्स्टिट्युटच्या ८६ विद्यार्थ्यांची दोन कंपनीत निवड
यड्राव (प्रतिनिधी) : यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या ८६ विद्यार्थ्यांची सेडमॅक मेकॅट्रॉनिक्स आणि वेद इंडस्ट्री या दोन नामांकित कंपनीत निवड झाली. महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कॉम्प्युटर, मेकॅनिकल, इलेक्ट्रीकल, ऑटोमेशन अॅण्ड रोबोटीक्स, मेकॅट्रॉनिकस या विभागातील विद्यार्थ्यांची निवड झाली.

सेडमॅक मेकॅट्रॉनिक्स कंपनी एकूण ५६ विद्यार्थ्यांची निवड झाली असून इलेक्ट्रॉनिक्स ४०, मेकॅनिकल २, इलेक्ट्रीकल ७, ऑटोमेशन अॅण्ड रोबोटीक्स २, मेकॅट्रॉनिकस ५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तर वेद इंडस्ट्री ह्या कंपनीत ३० विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. यामध्ये मेकॅनिकलमधील १४ व इलेक्ट्रीकलमधील १६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ह्या कंपन्यांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कॉम्प्युटर, मेकॅनिकल व इलेक्ट्रीकल ह्या विभागातील विद्यार्थ्यांना संधी मिळाली आहे.
सेडमॅक मेकॅट्रॉनिक्स ही पुणे येथील तंत्रज्ञान आधारित ऑटोमोबाईल आणि औद्योगिक नियंत्रण प्रणाली विकसित करणारी भारतीय कंपनी आहे. कंपनी मुख्यतः वाहनांसाठी इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट्स (ECU), इंजिन कंट्रोल सिस्टिम, इलेक्ट्रॉनिक फ्युएल इंजेक्शन (EFI), इंटिग्रेटेड स्टार्टर जनरेटर (ISG), मोटर कंट्रोलर्स आणि जनरेटर कंट्रोलर्स तयार करते.
वेद इंडस्ट्री ही कंपनी महाराष्ट्रात अभियांत्रिकी व फाउंड्री क्षेत्रातील काम करते. कंपनी प्रामुख्याने Cast Iron (CI), SG आयर्न कास्टींग, डकटाइल आयर्न कास्टिंग आणि मशिन्ड कंपोनेटस तयार करते. कंपनी ऑटोमोबाईल, ट्रॅक्टर, बांधकाम, मायनिंग आणि जनरल इंजिनिअरिंग क्षेत्रांसाठी विविध घटकांचे उत्पादन करते.
महाविद्यालयात विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट अंतर्गत ग्रुप डिसक्शन, इंटरव्ह्यु टेक्नीक्सचा सराव, पर्सनॅलिटी डेव्हलेपमेंट, इंटरपर्सनल स्किल्स, मॉक इंटरव्हयु यांची तयारी करुन घेतली जाते. तसेच प्रोजेक्ट बेसड लर्निंग, व्हॅल्य अॅडेड प्रोग्रॅम अशी कौशल्ये दिली जातात. कंपनीपूरक प्रशिक्षण दिले जाते त्याचा फायदा विद्यार्थ्यांना या कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी झाला.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी अभिनंदन केले. प्रभारी प्राचार्य डॉ. बी. बी. संगमे, ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट सेलचे प्रा. नेहा प्रसुन, डिन प्रा. ए.बी. जाधव, डॉ. विद्या पाटील, प्रा. प्रियाका कबाडे यांच्यासह सर्व डिन, विभागप्रमुख, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.




