शरदचंद्र पवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा
कोल्हापूर (प्रतिनिधी) - शरदचंद्र पवार यांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूर शहरातील मिरजकर तिकटी येथील अंध मूलांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना अन्नदान करुन मानवतेचा संदेश देत वाढदिवस साजरा केला. यावेळेस विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी प्रार्थना म्हणून शरदचंद्र पवार यांना दीर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमानंतर पक्ष कार्यालयात जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील व शहराध्यक्ष आर. के. पोवार यांच्या प्रमुख उपस्थितीत केक कापून शरदचंद्र पवार यांना दीर्घायुष्य लाभो अशा सदिच्छा व्यक्त करीत मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला.

या वाढदिवसाच्या शुभ मुहूर्तावर कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत विजयश्री खेचून आणण्याच्या कामात सर्वांनी झोकून देऊन कामाला लागावे असे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सरचिटणीस सुनील देसाई यांनी केले व आभार निरंजन कदम यांनी मानले.
यावेळी बाजीराव खाडे, पद्मजा तिवले, अनिल घाटगे, मकरंद जोंधळे, गणेश जाधव, गणेश नलावडे, सुरेश कुरणे, महादेव पाटील, रियाज कागदी, सोहेल फिरोज, सरगुर बागवान, लहू शिंदे, फिरोज उस्ताद, अरुणा पाटील, छाया नलवडे, नागेश शिंदे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




