शिव ठाकरेनं सांगितली कॉलेजमधील प्रेमाची गोष्ट; 9 वर्षांचं रिलेशनशिप
मुंबई (प्रतिनिधी) : टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरा अर्थात शिव ठाकरेचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. बिग बॉस या रिअॅलिटी शोमधून त्याला प्रसिद्धी मिळाली. त्यानं बिग बॉस ट्रॉफी जिंकली. तसेच 'द 50' या शोमध्येही त्यानं भाग घेतला, तसेच हा शो त्यानं जिंकला. तो सोशल मीडियातही सक्रीय असतो. शिव ठाकरे आपले वैयक्तिक क्षण सोशल मीडियात शेअर करतो. अलिकडेच शिव ठाकरेने रिलेशनशिप आणि ब्रेकअपबद्दल माहिती दिली. त्यानं अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत 9 वर्षांच्या रिलेशनशिपबद्दल सगळं सांगितलं. 9 वर्षांचं रिलेशनशिपमध्ये मिठाचा खडा कसा पडला? ब्रेकअप नेमकं कसं झालं? शिव ठाकरेने याची माहिती दिली.

अलिकडेच शिव ठाकरेने फिल्मीज्ञानला मुलाखत दिली होती. 9 वर्षांच्या रिलेशनशिपबाबतीत शिव ठाकरे म्हणाला, 'कॉलेजमध्ये असताना मी रिलेशनशिपमध्ये होतो. ते रिलेशनशिप माझं 9 वर्षांचं होतं. त्यानंतरचे रिलेशनशिप अडीच ते तीन वर्षांचं होतं. कॉलेज ते बिग बॉसच्या घरात जाईपर्यंत माझं रिलेशनशिप खूप चांगलं सुरू होतं. परंतु, बिग बॉसला जाण्यापूर्वी माझा ब्रेकअप झाला.तिचं लग्न झालं', असं शिव ठाकरे म्हणाला.
'जे काही होतं चांगल्यासाठीच होतं. आता मेसेज आणि फोन येऊन आपण तरी काय करणार आहे? आपल्या हातात काही गोष्टी नसतात. पण, एक गोष्ट कठीण आहे, ती म्हणजे, स्वीकार करुन पुढे जाणं खूप कठीण असतं', असं शिव ठाकरे म्हणाला.
'मी खूप रोमँटिक माणूस आहे, मी समोरच्या व्यक्तीवर खूप प्रेम करतो' स्वत:च्या प्रेम करणाच्या शैलीवर शिव ठाकरे म्हणाला, 'मी प्रचंड रोमँटिक माणूस आहे. जेव्हा एखादा व्यक्ती माझ्या आयुष्यात येते, तेव्हा त्या व्यक्तीवर मी प्रचंड प्रेम करतो. मी कधीही एकतर्फी प्रेम करत नाही. मी त्या व्यक्तीला खूप गिफ्ट्स पाठवतो. दोघांकडून समान प्रेम हवं, असं मला वाटतं. मला स्वयंपाक येत नाही, परंतु, मी इतर कामात नक्कीच मदत करु शकतो', असं शिव ठाकरे म्हणाला




