शेन वॉर्न ठरला मास्टरमाईंड, IPL मधून सर्वाधिक पैसा मिळवला

शेन वॉर्न ठरला मास्टरमाईंड, IPL मधून सर्वाधिक पैसा मिळवला

दिल्ली (प्रतिनिधी) : आयपीएलला सुरुवात होण्यापूर्वी राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला नवे मालक मिळाले आहेत. राजस्थान रॉयल्सची खरेदी अमेरिकेतील उद्योजक कल सोमानी यांनी केली आहे. राजस्थान रॉयल्सची डील 15290 कोटी रुपयांना झाली. या डीलचा फायदा शेन वॉर्नच्या कुटुंबीयांना झाला आहे. यासाठी शेन वॉर्ननं 19 वर्षांपूर्वी घेतलेला एक निर्णय महत्त्वाचा ठरला आहे. 

शेन वॉर्न यानं 2006-07 ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. दोन वर्षानंतर शेन वॉर्न आयपीएलच्या पहिल्या हंगामात राजस्थान रॉयल्समध्ये दाखल झाला होता. त्यावेळी शेन वॉर्न राजस्थानचा कॅप्टन आणि मेंटॉर देखील होता. राजस्थान रॉयल्सनं शेन वॉर्नवर दोन्ही जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या. याच्या बदल्यात शेन वॉर्न यानं प्रत्येक हंगामात खेळण्याचं मानधन आणि 0.75 इक्विटी मागितली होती. शेन नॉर्न चार वर्ष राजस्थान सोबत होता, त्यामुळं शेन वॉर्न याच्याकडे 3 टक्के इक्विटी जमा झाली होती. शेन वॉर्न यानं पहिल्या हंगामात राजस्थान रॉयल्सला विजेतेपद मिळवून दिलं होतं.  

 राजस्थान रॉयल्सची कल सोमानी यांच्या संघानं 15290  कोटी रुपयांना खरेदी केली. यामध्ये शेन वॉर्नच्या 3 टक्के शेअरचं मूल्यमापन केल्यास त्याचं मूल्य 450  ते 460 कोटी रुपये होतं. यामुळं आयपीएलमधून सर्वाधिक कमाई करणायच्या बाबतीत शेन वॉर्न पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. शेन वॉर्न यानं राजस्थान रॉयल्ससाठी 4 हंगाम खेळले. शेन वॉर्न यानं आयपीएलमध्ये 4 हंगाम खेळले यातून त्याला 9.35 कोटी मिळाले तर इक्विटीचं मूल्य 454.77 कोटी म्हणजे त्यानं 464.12 कोटी कमावले. 

विराट कोहलीनं आतापर्यंत आयपीएलच्या 18 हंगामात 230.14 कोटी कमावले आहेत. रोहित शर्मानं 211.20 कोटी तर महेंद्रसिंह धोनी यानं 192.84 कोटी कमावले आहेत. शेन वॉर्न यानं धाडसानं घेतलेला एक निर्णय आता त्याच्या कुटुंबासाठी त्याच्या निधनानंतर देखील फायदेशीर ठरणार आहे. शेन वॉर्न याचं 2022 मध्ये निधन झालं आहे. त्याच्या कुटुंबाला राजस्थान रॉयल्सच्या विक्रीमुळं 450 ते 460 कोटी रुपये मिळणार आहे. 

राजस्थान रॉयल्सच्या कल सोमानी यांच्यासोबत झालेल्या डीलला अंतिम रुप बीसीसीआयनं मंजुरी दिल्यानंतर होणार आहे. राजस्थान रॉयल्सची 2008 मध्ये इमर्जिंग मीडियानं  67 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सला खरेदी केली होती.