'हा' चित्रपट रांझणाचा सीक्वल आहे का? ; दिग्दर्शकाने दिलेलं उत्तर ऐकून थक्क व्हाल..

'हा' चित्रपट रांझणाचा सीक्वल आहे का? ; दिग्दर्शकाने दिलेलं उत्तर ऐकून थक्क व्हाल..

मुंबई - सोनम कपूर आणि धनुषची प्रमुख भूमिका असलेला ‘रांझणा’ हा 2013 चा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात कायम ताजा आहे. बनारसच्या गल्लीतील किशोरवयीन प्रेम, त्यातील हट्ट, वेड, वेदना आणि त्याग यांचं सुंदर चित्रण या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं. ‘तेरे इश्क में’ चा ट्रेलर लाँच झाला. या कार्यक्रमाला दिग्दर्शक आनंद एल. राय, कलाकार कृति सेनन आणि धनुष उपस्थित होते. ट्रेलर लाँचच्या वेळी सर्वाधिक चर्चेत असलेला प्रश्न होता  हा चित्रपट ‘रांझणा’चा सीक्वल आहे का?

धनुष आणि आनंद एल. राय ही जोडी पुन्हा प्रेमकथेत झळकताना दिसल्याने चाहत्यांमध्ये असा अंदाज बांधला जात होता. त्यावर माध्यमांनी थेट दिग्दर्शकांना प्रश्न विचारला आणि त्यांनी स्पष्ट उत्तर दिलं. आनंद एल. राय म्हणाले, “या चित्रपटात ‘रांझणा’ सारखं वेड आणि भावना आहेत, पण कथा पूर्णपणे नवी आहे. हो, माझा लीड हीरो पुन्हा धनुष आहे, इतकंच. ‘तेरे इश्क में’चा ‘रांझणा’शी कोणताही संबंध नाही. हा स्वतंत्र आणि वेगळा चित्रपट आहे.”

धनुष हिंदी चित्रपटांमध्ये कमी करतात, त्यामुळे त्यांनी चित्रपटासाठी त्वरित होकार दिला का, असा प्रश्न विचारल्यानंतर दिग्दर्शकांनी हसत उत्तर दिलं, “नातं जुळल्यानंतर गोष्टी सोप्या होतात. आमच्यातील प्रेमामुळे मला फार काही समजावं लागत नाही. पहिल्यांदा भेटलो तेव्हाही 10–15 मिनिटांत धनुष म्हणाले होते, ‘मी चित्रपट करतोय’. तेव्हाच कळलं की माझ्याकडे कलाकार नाही, भाऊ येतोय.”

‘तेरे इश्क में’ हा चित्रपट 28 नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. हिमांशु शर्मा यांनी कथा आणि संवाद लिहिले असून, त्यांची देसी स्टाईल आणि दमदार संवाद पुन्हा प्रेक्षकांना भुरळ घालतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. चित्रपटात धनुष आणि कृति सेनन मुख्य भूमिकेत आहेत. कथानक एका अशा प्रेमाचं आहे, ज्यात एकाची मनःस्थिती जळते तर दुसरा दुखावला जातो. ट्रेलरमध्ये धनुषची फ्लाइट लेफ्टनंट शंकर म्हणून दमदार एंट्री, भारतीय हवाई दलातील त्याची भूमिका आणि कृति सेननची तणावग्रस्त झलक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतात.