अरुण लखानींची राजकीय भूमिका वेगळी, नात्यांवर परिणाम नाही : सुप्रिया सुळे

अरुण लखानींची राजकीय भूमिका वेगळी, नात्यांवर परिणाम नाही : सुप्रिया सुळे

मुंबई (प्रतिनिधी) : भाजपने चंद्रपूर-गडचिरोली- वर्धा  या विधानपरिषदेच्या जागेवरुन उद्योगपती अरुण लखाणी यांना उमेदवारी दिली होती. अरुण लाखानी हे शरद पवार गटाचे खासदार सुप्रिया सुळे यांचे व्याही आहेत. सध्याच्या राजकारणात शरद पवार गट आणि भाजप हे परस्परविरोधी विचारसरणीचे प्रतिनिधित्व करतात. सुप्रिया सुळे आणि अरुण लखाणी यांच्या कुटुंबीयांनी अलीकडेच पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन रेवती-सारंग यांच्या लग्नाचे निमंत्रण त्यांना दिले होते. यानंतर काही दिवसांतच अरुण लखाणी यांना भाजपकडून विधानपरिषदेची उमेदवारी मिळाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या होत्या. याविषयी मंगळवारी पुण्यातील पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे यांना विचारणा करण्यात आली. यावेळी त्यांनी अरुण लखाणी यांना भाजपकडून मिळालेल्या उमेदवारीसंदर्भात भाष्य केले. 

अरुण भाईंची राजकीय विचारधारा आहे. त्यांना विधानपरिषदेची उमेदवारी मिळाली आहे. यामध्ये आमच्या कौटुंबिक नात्याचा संबंध नाही. त्यांनी त्यांचं राजकारण करावं, आम्ही आमचं करु. यामध्ये आमच्या मुलांचा काय संबंध? असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले. यावेळी सुप्रिया सुळे यांनी संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवरही भाष्य केले. त्यांनी म्हटले की, 'संजय राऊत साहेब आमचे मोठे भाऊ आहेत. त्यांना आम्हाला सगळं बोलण्याचा अधिकार आहे',असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.