अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सला विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती

अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सला विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती

कोल्हापूर (प्रतिनिधी) -   श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सला (स्वायत्त महाविद्यालय) प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी सर्वाधिक पसंती दिली. विद्यार्थ्यांना प्रवेशप्रक्रियेच्या पहिल्या फेरीतच महाविद्यालयातील प्रवेशक्षमतेच्या ८५ टक्क्यांपर्यंत प्रवेश मिळाले आहेत. महाविद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता, राबविण्यात येणारे विद्यार्थीकेंद्रित उपक्रम, कॅम्पस प्लेसमेंटच्या संधी, शासनमान्य विनामूल्य स्कील डेव्हलपमेंट कोर्सेस, प्रकल्पाधारित शिक्षण, संशोधन व विकासासाठी देण्यात येणारे प्राधान्य, इंडस्ट्री कनेक्ट यामुळेच महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांचा ओढा वाढत आहे, असे मत कॅम्पस डायरेक्टर प्रा‌. पी. बी. घेवारी यांनी व्यक्त केले. महाविद्यालयामध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभात ते बोलत होते.

महाविद्यालयाच्या संचालिका प्रा. डॉ. एस. आर. चौगुले म्हणाल्या, "विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. यावर्षीची प्रवेश संख्या पाहता महाविद्यालयाने पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. विद्यार्थ्यांना कौशल्याभिमुख शिक्षण देण्यावर महाविद्यालयाचा भर असून भविष्यातही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालय कटिबद्ध आहे."

कॉम्प्युटर सायन्स, एआय अँड मशीन लर्निंग, एआय अँड डेटा सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हील आदी विभागांमध्ये प्राजक्ता पाटील, प्रणव बिडकर, मोहम्मदजैद काझी, प्रणाली पाटील, श्रद्धा शर्मा, रितेश सालकर, कुंदन जाधव, शिवेंद्र मधाळे, स्नेहल वरेकर, पार्थ शेलार, समृद्धी किणीकर या नवीन प्रवेशित पहिल्या ११ विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी स्टुडन्ट अफेयर्स डीन डॉ. जे. एम. शिंदे, जनसंपर्क अधिकारी डॉ. दिग्विजय पवार, प्रा. सूरज रेडेकर, प्रथम वर्ष विभागप्रमुख डॉ. अमोल सूर्यवंशी, प्रा. संग्राम पेटकर आदी उपस्थित होते.

महाविद्यालयाच्या वाटचालीस संस्थेचे अध्यक्ष विजयसिंह माने, जिल्हा परिषद माजी सदस्या मनीषा माने यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभत आहे.