अशोक खरात-रुपाली चाकणकरांचे अनेक फोटो व्हायरल
नाशिक (प्रतिनिधी) : गुंगीचं औषध देऊन अत्याचार केल्याप्रकरणी नाशिकमध्ये कॅप्टन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरातला नाशिक पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर काल अशोक खरातला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने अशोक खरातला 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अशोक खरातवर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली चाकणकर यांनी अशोक खरातच्या पाद्यपूजेचा व्हिडीओ समोर आला. तसेच अशोक खरात आणि रुपाली चाकणकर यांचे विविध कार्यक्रमातील फोटोही समोर आल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. रुपाली चाकणकरांविरोधात आज शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे, सामाजित कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. याचदरम्यान, आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
महाडमधील एका कार्यक्रमाला सुनील तटकरे यांनी उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमानंतर माध्यमांशी सुनील तटकरेंना अशोक खरात प्रकरणावरुन रुपाली चाकणकरांबाबत प्रश्न विचारला. यावर सुनील तटकरे चांगलेच संतापल्याचे दिसून आले. ही जागा बोलायची नाही. मी योग्यवेळी बोलेन. मला घटनेने आधिकार दिला आहे, मला ज्यावेळी बोलायचं आहे, त्यावेळी बोलेन, असं सांगत सुनील तटकरे निघून गेले.
रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांचे घरगुती संबंध आहेत. खरातच्या मुलीच्या लग्नाला चाकणकर होत्या. चाकणकरांचा घरात खरातची भाची राहते, असा दावाही सुषमा अंधारे यांनी केला. रुपाली चाकणकरांना तातडीने अटक करा, रुपाली चाकणकरांची समोरासमोर चौकशी झाली पाहिजे. चाकणकरांची नार्को टेस्ट झाली पाहिजे, अनेक महिलांचे लैंगिक शोषण झालं आहे. चाकणकरांची नार्को टेस्ट झाली पाहिजे, हे सगळ करण्याअगोदर त्यांना त्या पदावरून काढलं पाहिजे, अशी मागणी सुषमा अंधारेंनी केली. रूपाली चाकणकर फरार होण्याअगोदर त्यांचा राजकीय दबाव वापरू शकतात. त्यांनी आपल्या पदाचा दुर्गोपयोग करत अनेकांवर दबाव आणला. काही पीडित म्हणतात, चाकणकर आम्हाला रात्री 2-2 वाजता धमकी देत होत्या. चाकणकर आणि कॅप्टन खरात यांच कोणत्यावेळी काय बोलण झालं हे समोर येण गरजेचं आहे. खरातने काही लोकांची मदत मागितली का? हे समोर येणं गरजेचं आहे. पोलिसांबरोबर आर्थिक गुन्हे शाखेने खरात आणि रुपाली चाकणकर यांचे संपत्तीचे स्रोत तपासले गेले पाहिजे. खरातची संपत्ती परदेशात देखील आहे.रुपाली चाकणकरांना तात्काळ ताब्यात घ्यावं, असं सुषमा अंधारेंनी सांगितलं.




