कोल्हापूर जिल्हा परिषदेत स्व. अजित पवार यांची जयंती उत्साहात

कोल्हापूर जिल्हा परिषदेत स्व. अजित पवार यांची जयंती उत्साहात

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने स्वर्गीय अजित अनंतराव पवार यांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. या विशेष कार्यक्रमास जिल्हा परिषदेतील पदाधिकारी, वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मोठी उपस्थिती लाभली .

कार्यक्रमाची सुरुवात स्व. अजित अनंतराव पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्षा  शिल्पा खोत आणि उपाध्यक्ष तानाजी पाटील यांच्या शुभहस्ते प्रतिमेचे पूजन  करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जॅसमिन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, बांधकाम व आरोग्य समितीच्या सभापती  सारिका नांदेकर, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती श्रीमती विद्या पाटील, माजी शिक्षण सभापती प्रवीण यादव तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) ओमप्रकाश यादव यांच्यासह सदस्य  उपस्थित होते.

या प्रसंगी उपस्थितांनी स्व. अजित अनंतराव पवार यांच्या सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील मोलाच्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा वारसा आणि विचार हे सदैव प्रेरणादायी राहतील, अशा भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या.

कार्यक्रमात जिल्हा परिषदेतील सर्व विभागांचे खातेप्रमुख, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन मेन राजाराम हायस्कूलच्या अध्यापिका सुषमा पाटील यांनी केले.