क्युरा लाईफ कॅन्सर सेंटरच्या वतीने महिलांसाठी ७ सप्टेंबर रोजी विशेष कॅन्सर तपासणी शिबिर

क्युरा लाईफ कॅन्सर सेंटरच्या वतीने महिलांसाठी ७ सप्टेंबर रोजी विशेष कॅन्सर तपासणी शिबिर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महिलांमध्ये आढळणाऱ्या स्तनाच्या कर्करोगाचे लवकर निदान व्हावे आणि त्यावर वेळेत उपचार सुरू करता यावेत, या उद्देशाने हेल्थ विदिन रीच फाउंडेशन आणि क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर कोल्हापूर यांच्या सहकार्याने डिजिटल मॅमोग्राफी व्हॅनद्वारे विशेष स्तन कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सोमवार ७ सप्टेंबर रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत छत्रपती राजाराम महाराज विद्यालय, शाळा क्रमांक ९ मैदान, राजारामपुरी, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिरामध्ये अत्याधुनिक डिजिटल मॅमोग्राफी व्हॅनद्वारे महिलांची स्तन तपासणी करण्यात येणार आहे. अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, योग्य वयातील महिलांनी नियमित मॅमोग्राफी करून घेणे महत्त्वाचे आहे. स्तनाच्या कर्करोगाचे लवकर निदान झाल्यास उपचारांचे परिणाम अधिक चांगले होण्याची शक्यता असते. 

४० वर्षांवरील महिलांसाठी विशेषतः उपयुक्त, स्तनात गाठ, वेदना, त्वचेवर बदल किंवा स्तनाग्रातून रक्तस्राव जाणवत असल्यास, कुटुंबात स्तनाच्या कॅन्सरचा इतिहास असल्यास किंवा कोणतीही लक्षणे नसली तरी नियमित तपासणी करून घेऊ शकता. 

सर्व महिलांनी या आरोग्य उपक्रमाचा लाभ घ्यावा आणि स्तनाच्या कर्करोगापासून सुरक्षिततेसाठी मॅमोग्राफी तपासणी करून घ्यावी, असे आवाहन क्युरालाईफ कॅंन्सर सेंटरचे संचालक डॅा. अक्षय शिवछंद यांनी केले आहे. शिबिराचा लाभ घेण्याकरिता ९०२८ ६१० ४७० या मोबाईल नंबर वर आपली नाव नोंदणी करण्यात यावी.