जडेजाच्या जागी CSK ने 'या' क्रिकेटपटूला केले संघात सामील

जडेजाच्या जागी CSK ने 'या' क्रिकेटपटूला केले संघात सामील

Cricket News - IPL 2026 च्या रिटेन्शन घोषणांपूर्वीच क्रिकेटविश्वात मोठे बदल पाहायला मिळत आहेत. इंडियन प्रीमियर लीगमध्ये अनेक मोठ्या खेळाडूंच्या ट्रेडची अधिकृत घोषणा झाली असून, यामध्ये सर्वात चर्चेचा विषय म्हणजे रवींद्र जडेजा. दीर्घकाळ चेन्नई सुपर किंग्ज (CSK) सोबत असलेला जडेजा आता CSK सोडून राजस्थान रॉयल्स (RR)मध्ये सामील झाला आहे. राजस्थान रॉयल्सने जडेजाला 14 कोटी रुपयांत खरेदी केले आहे. CSKसाठी सहा हंगामांहून अधिक काळ खेळलेला आणि संघाला विजेतेपदी नेण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेला जडेजा, राजस्थानसाठी आगामी हंगामात मोठा आधार ठरणार आहे.

जडेजाच्या जागी CSKने मोठा निर्णय घेत संपूर्ण IPLमध्ये सर्वाधिक पसंतीचा खेळाडू संजू सॅमसनला 18 कोटी रुपयांत ट्रेड करून संघात सामील केले आहे. राजस्थानकडून दीर्घकाळ खेळणारा संजू आता CSKच्या कोचिंग स्टाफ आणि MS धोनी यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणार आहे. हा बदल CSKच्या आगामी तीन वर्षांच्या धोरणाचा भाग असल्याचे सांगितले जात आहे.

CSKसाठी हा निर्णय किती कठीण होता, याची कबुली संघाचे मॅनेजिंग डायरेक्टर के. एस. विश्वनाथन यांनी दिली. त्यांनी सांगितले की दशकाहून अधिक काळ संघाचा आधारस्तंभ राहिलेला रवींद्र जडेजा आणि सातत्यपूर्ण कामगिरी करणारा सॅम करण या दोघांना निरोप देणे हा फ्रँचायझीच्या इतिहासातील सर्वात कठीण निर्णय होता.

विश्वनाथन यांनी नमूद केले की दोन्ही खेळाडूंशी सविस्तर चर्चा करून, त्यांच्या पूर्ण सहमतीने हा निर्णय घेतला गेला आहे. CSKसाठी जडेजाचे योगदान अविस्मरणीय राहणार आहे, आणि जडेजा व करण यांच्या भावी प्रवासासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.

IPL 2026 ट्रेडची यादी :

- संजू सॅमसन (CSKकडे ट्रेड) - 18 कोटी रुपये

- रवींद्र जडेजा (RRकडे ट्रेड) - 14 कोटी रुपये

- सॅम करण (RRकडे ट्रेड) - 2.4 कोटी रुपये

- मोहम्मद शमी (LSGकडे ट्रेड) - 10 कोटी रुपये

- मयंक मारकंडे (MIकडे ट्रेड) - 30 लाख रुपये

- अर्जुन तेंडुलकर (LSGकडे ट्रेड) - 30 लाख रुपये

- नीतीश राणा (DCकडे ट्रेड) - 4.2 कोटी रुपये

- डोनोवन फरेरा (RRकडे ट्रेड) - 1 कोटी रुपये