जितेंद्र शेळकेंसह पत्नीचा जागीच मृत्यू, अशोक खरातच्या अटकेचा तणाव
मुंबई (प्रतिनिधी) : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याची सध्या एसआयटीकडून कसून चौकशी सुरु आहे.महिलांचा लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अशोक खरातला ताब्यात घेण्यात आलं आहे. तसेच सदर प्रकरणात अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. याचदरम्यान, आज अशोक खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन झालं आहे.

समृद्धी महामार्गावर जितेंद्र शेळकेंच्या कारचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये जितेंद्र शेळके यांचा जागीच मृत्यू झाला.सदर अपघातामध्ये जितेंद्र शेळके यांच्या पत्नी अनुराधा जितेंद्र शेळकेंचा देखील मृत्यू झाला आहे. तर मुलगा गंभीर जखमी आहे.छत्रपती संभाजीनगरहून शिर्डीकडे येताना धोत्रे गावाजवळ जितेंद्र शेळकेंच्या कारचा अपघात झाला. यामध्ये जितेंद्र शेळकेंचा मृत्यू झाला.
जितेंद्र शेळके यांची कारने थेट उभ्या असणाऱ्या कंटेनरला पाठीमागून धडक दिली. यावेळी कार थेट कंटेनरखाली घुसली.जितेंद्र शेळके अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष राहिले आहेत.जितेंद्र शेळकेंच्या लॉन्समध्येही अशोक खरातची भागिदारी होती.अशोक खरातला अटक झाल्यापासून जितेंद्र शेळके तणावात होते.अशोक खरातचे निकटवर्तीय म्हणून ओळख असणाऱ्या जितेंद्र शेळकेंचा मृत्यू झाल्याने विविध प्रश्न आता उपस्थित होत आहेत.




