ठाकरे बंधूंच्या जल्लोषावर प्रकाश महाजनांचा निशाणा; 'बाळासाहेब वाघ होते, आता नातू स्वतःला झुरळ म्हणतोय' अशी टीका
मुंबई (प्रतिनिधी) : शिवाजी पार्कवरील ठाकरे बंधूंच्या विजयी जल्लोषावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

केंद्र सरकारकडून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर ठाकरे बंधूंनी केलेल्या जल्लोषाचा संदर्भ देत प्रकाश महाजन म्हणाले की, राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी ठाकरेंना अशा आंदोलनांचा आधार घ्यावा लागत आहे.यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत, "बाळासाहेब ठाकरे यांना वाघ म्हटलं जायचं, पण त्यांचा नातू स्वतःला झुरळ म्हणतोय," अशी बोचरी टिप्पणी केली.
राज ठाकरे यांच्या भूमिकेवरही प्रकाश महाजन यांनी प्रश्न उपस्थित केले. राज ठाकरे हे महाराष्ट्रातील मोठी ताकद असलेले नेते आहेत, मात्र त्यांनी आपल्या क्षमतेचा योग्य वापर केला नाही, अशी टीका त्यांनी केली.
ठाकरे बंधूंच्या शिवाजी पार्कवरील सभेवर निशाणा साधताना महाजन यांनी, हा जल्लोष म्हणजे राजकीय आधार शोधण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला. तसेच, ठाकरे कुटुंबाच्या राजकीय भूमिकेवरून त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले.
दरम्यान, ठाकरे गटाकडून या टीकेला अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र, या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.




