पत्नीने केला पतीचा असा निर्घून खून ; कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क...
पुणे - पिंपरी चिंचवड परिसरात पती - पत्नीच्या नात्याला हादरवणारी धक्कादायक घटना आज पहाटेच्या सुमारास घडली. सततच्या चारित्र्याच्या संशयाला कंटाळून एका महिलेनं आपल्या पतीचा गळा आवळून खून केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव नकुल आनंद भोईर असे असून पत्निचं नाव चैताली भोईर असं आहे. आज दोघांमध्ये पहाटेच्या सुमारास तीव्र वाद झाला. चारित्र्याच्या संशयावरून सुरू झालेलं भांडण चांगलंच पेटलं आणि रागाच्या भरात चैतालीने नकुलचा कापडाने गळा आवळून खून केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत चैताली भोईरला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे.
या दाम्पत्याला दोन लहान मुले आहेत. एकाचं वय पाच वर्षं तर दुसरं केवळ दोन वर्षांचं आहे. या दुर्दैवी घटनेनंतर कुटुंबावर मोठं संकट कोसळलं आहे.
नकुल भोईर समाजकारणात सक्रिय होता. तो विविध सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेत असे, तसेच मराठा क्रांती मोर्चासह अनेक संघटनांशी त्याचे संबंध होते. काही स्थानिक नेत्यांशीही त्याची जवळीक असल्याची माहिती समोर आली आहे. नकुल आपल्या पत्नीला राजकारणात पुढे आणण्याचा प्रयत्न करत होता आणि आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत तिला उमेदवारी मिळवून देण्याचा त्याचा प्रयत्न होता.




