परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यातर्फे छत्रपती संभाजीनगर बसस्थानकासह ४ बसस्थानकांचे उद्घाटन
कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे शुक्रवार, दि. १७ एप्रिल २०२६ रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येणार असून त्यांच्या हस्ते शासन निधीतून बांधण्यात आलेल्या कोल्हापूर शहरातील एसटीच्या नूतन छत्रपती संभाजीनगर बसस्थानकासह चार बसस्थानकांचे उद्घाटन होणार आहे.

यामध्ये छत्रपती संभाजीनगर बसस्थानकाचे उद्घाटन दुपारी ४.०० वाजता, वाठार बसस्थानकाचे उद्घाटन दुपारी १.२० वाजता, पेठवडगाव बसस्थानकाचे उद्घाटन दुपारी १२.४० वाजता, तर जयसिंगपूर बसस्थानकाचे उद्घाटन दुपारी २.२० वाजता होणार आहे.
संभाजीनगर बस स्थानकासाठी 9.80 कोटी, पेठवडगाव बस स्थानक 1 कोटी, वाठार बसस्थानक 1 कोटी, जयसिंगपूर 2 कोटी निधी तत्कालीन पालकमंत्री तथा परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी 2021, 2022 मध्ये मंजूर केला होता.
या दौऱ्यात मंत्री सरनाईक कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकाची पाहणी करणार असून सकाळी ११.३० वाजता श्री क्षेत्र अंबाबाई मंदिर येथे दर्शन घेणार आहेत. तसेच दुपारी २.३० वाजता नृसिंहवाडी येथे श्री दत्त महाराजांचे दर्शन घेणार आहेत.
या दौऱ्याच्या अनुषंगाने प्रशासनाला आवश्यक त्या सर्व व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले असून विविध ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि नागरिकांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडणार आहेत.




