केआयटी च्या सहकार्याने मिळणार २ ते १० लाखापर्यंत डीएसटी इग्निशन ग्रांट

केआयटी च्या सहकार्याने मिळणार २ ते १० लाखापर्यंत डीएसटी इग्निशन ग्रांट

कोल्हापूर (प्रतिनिधी) : विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील नाविन्यपूर्ण कल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान (डीएसटी) विभागाकडून इग्निशन ग्रांट योजना राबविण्यात येत आहे. केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (प्रदत्त स्वायत्त ) इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशन (आय.आर.एफ.) च्या माध्यमातून या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना, संशोधकांना आणि उद्योजकांना त्यांच्या कल्पनांचे प्रत्यक्ष तंत्रज्ञान, प्रोटोटाइप किंवा स्टार्टअपमध्ये रूपांतर करण्यासाठी मदत केली जाते.केआयटी च्या सहकार्याने मिळणार २ ते १० लाखापर्यंत डीएसटी इग्निशन ग्रांट उपलब्ध झाली आहे.

निवड झालेल्या प्रकल्पांना केवळ आर्थिक मदतच नाही, तर तांत्रिक मार्गदर्शन, व्यवसाय मॉडेल तयार करण्यास मदत, उद्योग तज्ज्ञांचे मार्गदर्शन, बाजारपेठेची माहिती, नेटवर्किंग संधी आणि इन्क्युबेशन सुविधा  ही सर्व मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे. गेल्या वर्षी दहा स्टार्टअप्सना मिळून रु.५० लाख रुपयांची डिएसटी इग्निशन ग्रँड देण्यात आलेली होती.यावर्षी दर्जेदार स्टार्टअप्सना अधिक रक्कम देण्याचा प्रयत्न असेल. इनोव्हेटर्स विद्यार्थ्यांना स्टार्टअप्ससाठी सुवर्णसंधी मिळणार आहे.

 या योजनेमधून उद्योजक वाढले तर रोजगार वाढतील. सुरुवातीलाच येणाऱ्या आर्थिक अडचणींमुळे अनेक उदयोन्मुख उद्योजक आपल्या कल्पना प्रत्यक्षात आणू शकत नाहीत त्याचाच विचार करून भारत सरकारने ही योजना केआयटी सारख्या कॉलेजच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवण्याचा उपक्रम राबवलेला आहे.