पुणे विधानपरिषद निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये खळबळ; अरविंद शिंदेंची हायकमांडकडे धाव

पुणे विधानपरिषद निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये खळबळ; अरविंद शिंदेंची हायकमांडकडे धाव

पुणे (प्रतिनिधी) : पुणे विधान परिषद निवडणुकीनंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद पेटला असल्याचं चित्र दिसून येत आहे. पुण्यातील काँग्रेसचे नगरसेवक अरविंद शिंदे यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली असल्याची माहिती समोर आली आहे. अरविंद शिंदे यांनी मलिकार्जुन खरगे  आणि के सी वेनूगोपाल यांना मेल करत तक्रार केली असल्याची माहिती आहे. विधानपरिषद निवडणुकीत शरद पवार गटाला पाठिंबा देण्यावरून काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद निर्माण झाला आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुण्यात कुणाशी चर्चा न करता शरद पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याचा शिंदेचा आरोप आहे. यासंदर्भात कारवाई करण्याची मागणी अरविंद शिंदे यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. महाविकास आघाडीत काँग्रेसची गळचेपी होत असल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे. अरविंद शिंदे आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत.

पुणे विधानपरिषद निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता पुण्यातील काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आल्याचं दिसून येत आहे. महाविकास आघाडीत काँग्रेसची गळचेपी होत असल्याचा थेट आरोप करत पुण्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी नगरसेवक अरविंद शिंदे यांनी थेट पक्षश्रेष्ठींकडे धाव घेतली आहे. अरविंद शिंदे यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मलिकार्जुन खर्गे आणि सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांना थेट ईमेल पाठवून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात तक्रार केल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

विधानपरिषद निवडणुकीत शरद पवार गटाला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून काँग्रेसमध्ये हा अंतर्गत वाद निर्माण झाला आहे. "प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुण्यात स्थानिक पातळीवर कोणत्याही नेत्याशी किंवा कार्यकर्त्याशी चर्चा न करता, परस्पर शरद पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला," असा गंभीर आरोप अरविंद शिंदे यांनी केला आहे. या एकतर्फी निर्णयामुळे पक्षाचे नुकसान होत असून, या संदर्भात तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिंदे यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे.