बारामतीत पुन्हा एकदा विमान अपघात! लँडिंग दरम्यान शिकाऊ विमान कोसळले

बारामतीत पुन्हा एकदा विमान अपघात! लँडिंग दरम्यान शिकाऊ विमान कोसळले

बारामती : पुण्यातील बारामती विमानतळ परिसरातून एक मोठी आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. बारामती विमानतळावर आज पुन्हा एकदा शिकाऊ (प्रशिक्षणार्थी) विमान कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

लँडिंग करताना अपघात
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हे प्रशिक्षणार्थी विमान लँडिंग होत असताना अपघातग्रस्त झाले. हे विमान नेमके कोणत्या तांत्रिक कारणामुळे कोसळले तसेच यात पायलट किंवा अन्य कोणी जखमी झाले आहे का, याबाबतची सविस्तर अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

तपासाला सुरुवात
दुर्घटनेची माहिती मिळताच संबंधित आपत्कालीन यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित असलेल्या या विमानतळावर पुन्हा पुन्हा विमानाचा अपघात होत असल्याने, येथील सुरक्षेबाबत आणि लँडिंग व्यवस्थेवर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अपघाताच्या अचूक कारणांचा तपास प्रशासनाकडून सुरू आहे.