मोठी बातमी! शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी उद्या जाहीर? 30 जुलैपूर्वी खात्यात पैसे येणार

मोठी बातमी! शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी उद्या जाहीर? 30 जुलैपूर्वी खात्यात पैसे येणार

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीची प्रतीक्षा आता संपण्याची चिन्हे दिसत आहेत. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कर्जमाफीची प्राथमिक यादी उद्या जाहीर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती दिली आहे.

सरकारला केंद्राकडून आयकर परताव्याशी संबंधित आवश्यक डेटा प्राप्त झाला असून, तांत्रिक अडचणीही दूर झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे 30 जुलैपूर्वी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्याचे सरकारचे नियोजन असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, बोगस बियाणे प्रकरणातही सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. आतापर्यंत 11,584 तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी 8,192 प्रकरणांची तपासणी पूर्ण झाली आहे. तपासणीत 763 नमुने निकृष्ट आढळल्याने 81 कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

खरीप हंगामात सोयाबीन बियाण्यांच्या उगवण क्षमतेबाबत सर्वाधिक तक्रारी अकोला, अमरावती, बुलढाणा आणि यवतमाळ या जिल्ह्यांतून आल्या आहेत.

आता सर्वांचे लक्ष उद्या जाहीर होणाऱ्या प्राथमिक यादीकडे लागले आहे. तुमचे नाव यादीत आहे का, हे तपासण्यासाठी अधिकृत माहितीवर लक्ष ठेवा.