रिया अहिरनं 'अंकल' म्हटलं अन् भाजप नेत्याचा पारा चढला; शहजाद पूनावालांनी थेट राहुल गांधींचं नाव घेत सुनावलं
मुंबई (प्रतिनिधी) : भाजपचे माजी प्रवक्ते शहजाद पूनावाला आणि मुंबईतील मॉडेल रिया अहिर यांच्यात जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. 'बिग बॉस 20'मध्ये एका कंटेस्टंटला प्रेक्षकांच्या वोटिंगद्वारे घरात प्रवेश देण्यात आला होता. यामध्ये रिया अहिरला प्रेक्षकांनी पसंती न दिल्याने बिग बॉसच्या घरात जाण्याआधीच ती एलिमिनेट झाली. त्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी तिची खिल्ली उडवली. यामध्ये भाजपचे माजी प्रवक्ते शहजाद पूनावाला यांचाही समावेश होता. ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी रियाच्या बुद्धिमत्तेवर आणि ज्ञानावरही टीका केली. त्यानंतर हा वाद आणखी चिघळला.

रियानंही शहजाद पूनावाला यांना प्रत्युत्तर देताना त्यांचा उल्लेख 'अंकल' असा केला. त्यानंतर मात्र भाजप नेत्याचा पारा चांगलाच चढला. त्यांनी रियाला थेट आणि भाजपचे माजी प्रवक्ते शहजाद पूनावाला यांच्यातील ही शाब्दिक चकमक आता चर्चेत आली आहे. रियानं भाजप नेत्य राहुल गांधींचं नाव घेत सुनावलं. 'तुझा IQ राहुल गांधींसारखाच आहे,' असं म्हणत चिडलेल्या शहजाद पूनावाला यांनी रिया अहिरवर टीका केली. 'बिग बॉस 20'च्या घरात जाण्याआधीच एलिमिनेट झालेली मॉडेल रिया अहिर आणि भाजपचे माजी प्रवक्ते शहजाद पूनावाला यांच्यातील ही शाब्दिक चकमक आता चर्चेत आली आहे. रियानं भाजप नेत्याला 'अंकल' म्हटल्यानंतर हा वाद आणखी वाढला. त्यानंतर पूनावाला यांनी तिची थेट काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी तुलना केली.
'जेन झेड'च्या एका आंदोलनादरम्यान आंदोलक विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी पोलिसांची व्हॅन अडवल्यामुळे रिया अहिर चर्चेत आली होती. त्यानंतर 'बिग बॉस सीझन 20'मध्ये जाण्यासाठी तिची निवड करण्यात आली. मात्र तिच्यात आणि पंजाबी अभिनेत्री लव्ह गिल हिच्यात वोटिंग घेण्यात आलं आणि अंतिम निर्णय प्रेक्षकांवर सोपवण्यात आला. या मतदानात लव्ह गिल विजयी झाली आणि रिया अहिरला 'बिग बॉस'च्या घरात जाण्याआधीच एलिमिनेट व्हावं लागलं.
यानंतर शहजाद पूनावाला यांनी सोशल मीडियावरील एका रीलच्या माध्यमातून रियावर टीका केली. तिच्या आंदोलनाचा फोटो किंवा व्हिडीओ हा एक 'स्क्रिप्टेड' स्टंट असल्याचा दावा त्यांनी केला. तसंच राहुल गांधींपासून राज ठाकरे, सुप्रिया सुळे आणि डिंपल यादव यांच्यासारख्या विविध नेत्यांनी आणि सार्वजनिक व्यक्तिमत्त्वांनी त्याला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी दिल्याचंही त्यांनी म्हटलं. पूनावाला यांनी पुढे म्हटलं की, एखादा स्क्रिप्टेड फोटो व्हायरल करणं किंवा राहुल गांधींपासून राज ठाकरेंपर्यंतच्या व्यासपीठांवर स्थान मिळवणं आणि प्रत्यक्ष 'बिग बॉस'च्या घरात प्रवेश करून जनतेचा कौल जिंकणं, यात मोठा फरक आहे.
रियाला मिळालेल्या समर्थनाचं श्रेय त्यांनी 'डाव्या विचारसरणीच्या इकोसिस्टम' आणि 'मोदी-विरोधी युट्यूबर्स' यांना दिलं. 'जनरेशन झेड'चा चेहरा म्हणून ज्यांनी रियाचं कौतुक केलं, त्यांच्यासाठी तिला 'बिग बॉस'मधून बाहेर पडावं लागणं ही मोठी नामुष्की असल्याचंही पूनावाला यांनी म्हटलं. लव्ह गिलशी रियाची तुलना करताना त्यांनी नमूद केलं की, लव्ह मंदिरं आणि गुरुद्वारांना भेटी देते, गोसेवा करते, भारतीय लष्कराचा आदर करते आणि अपशब्द वापरत नाही.
यावर रियानं शहजाद पूनावाला यांना 'अंकल' म्हणून संबोधत प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर पूनावाला यांनी राहुल गांधींचं नाव घेत केलेली टीका आणि दोघांमधील ही शाब्दिक चकमक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.




