वेश्या व्यवसाय चालवणारी टोळी जेरबंद ; दोन पिडीत महिलांची सुटका

वेश्या व्यवसाय चालवणारी टोळी जेरबंद ; दोन पिडीत महिलांची सुटका

कोल्हापूर (प्रतिनिधी) - महिलांच्या आर्थिक दुर्बलतेचा गैरफायदा घेत वैश्या व्यवसाय करणाऱ्या १ महीला व ३ पुरूष यांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की, उचगांव ते गडमुडशिंगी जाणाऱ्या रोडवरील एका अपार्टमेंटमध्ये बेकायदेशीर वेश्या व्यवसाय सुरू आहे. त्यानुसार पथकाने वेश्या व्यवसाय चालणाऱ्या ठिकाणी बोगस गि-हाईक पाठवुन मिळाले बातमीबाबत खात्री करून पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक शितलकुमार कोल्हाळ यांच्या पथकाने अंमलदारसह छापा टाकत कारवाई केली. 

सुजाता सचिन साळुंखे वय 34, सध्या रा. संजय मोहीते यांच्या घरी भाड्याने उचगांव,मुळ गाव मिरज येथे राहत असताना वेश्या व्यवसाया करीता वापरत असलेल्या मुंबई येथील 01 व इचलकरंजी येथील 01 अशा एकुण 02 पिडीत महिलांची सुजाता साळुंखे हिच्या ताब्यातून पथकाने सुटका केली आहे. तसेच सुजाता साळुंखे ही वैश्या व्यवसायासाठी महिलांना घेवून येण्यासाठी ज्यांना सांगायची ते तिघे संशयित सुमित नेमीनाथ देशमाने वय 29, रा इचलकरंजी व लखन मोहन कांबळे वय 36, रा. कोल्हापूर, तौसिफ ताजुद्दीन सुतार वय 36, रा. कोल्हापूर या तिघांना एक चारचाकी व एक दुचाकी यासह ताब्यात घेतले. या कारवाईत 8,56,530/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये 10,470/-रूपये रोख रक्कम, 05 मोबाईल हँडसेट, 01 स्विफ्ट डिझायर कार, 01 अप्पे रिक्षा व निरोध पाकीटे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

महीला संशयित आरोपी सुजाता सचिन साळुंखे हिची चौकशी केली असतै, तिने सांगितले की, एखादे गि-हाईक शरीर गमनासाठी आल्यानंतर त्या मुलींना सुमित देशमाने रा. इचलकरंजी व तौफिक सुतार रा. विक्रमनगर, कोल्हापूर या दोघांमार्फत शरीरगमनासाठी बोलावुन घेते व या मुली सांगेल त्या गि-हाईकांशी शरीरगमन करून प्रत्येक गि-हाईकमागे 500/- रूपये ठेवुन घेतात व सुमित देशमाने व तौफिक सुतार या दोघांना गाडी भाड्यासह प्रत्येक मुलीमागे पैसे देत असल्याचे सांगितले. तसेच संशयित आरोपी सुमित देशमाने, लखन कांबळे, तौसिफ सुतार यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी, सुजाता साळुंखे जे सांगेल त्या ठिकाणावरून त्याच वाहनातून वैश्या व्यवसायाकरीता मुली घेवून येत असल्याचे सांगितले.

या कारवाईत पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसनिरीक्षक रविंद्र कळमकर, सहा पोलीस निरीक्षक, शितलकुमार कोल्हाळ, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक, राजेंद्र घारगे व हिंदुराव चरापले, पोलीस अंमलदार सायली कुलकर्णी, अश्विन डुणूंग, उत्तम सडोलीकर, अमित मर्दाने व प्रज्ञा पाटील यांनी केली आहे.