शरद इजिनिअरिंगमध्ये २४ व २५ मार्चला पुस्तक प्रदर्शन
यड्राव (प्रतीनिधी) : यड्राव येथील शरद इस्टिट्युट ऑफ टेक्ऩॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २४ आणि २५ मार्च रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांच्या हस्ते होणार आहे.

या प्रदर्शनात मराठी, हिंदी, इंग्रजी, कथा, कादबंरी, चरित्रे, वाड:मय, व्यक्तिमत्व विकास, स्पर्धा परिक्षा, एम.पी.एस.सी., यु.पी.एस.सी., अभियांत्रिकी, तांत्रिकी, व्यवस्थापन यासह विविध विषयावरील हजारो पुस्तकांचा समावेश आहे. यामध्ये बेस्ट बुक सेलर्स मार्फत टीएमएच, पिअरसन, वायली, आय.के. केम्ब्रिंज, सीआरसी आदी प्रकाशक तांत्रिक पुस्तकासह सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर मेहता बुक सेलर हे इतर वाड:मय साहित्यासह सहभागी होणार आहेत. प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून सवलतीच्या दरात पुस्तके खरेदी करता येणार आहेत. तरी जास्तीजास्त वाचक रसीक, विद्यार्थी व सार्वजनिक ग्रंथालयांनी प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन शरद इंजनिअरिंगचे ग्रंथपाल युवराज पाटील यांनी केले आहे.




