श्री छत्रपती शाहू साखर कारखाना येथे राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहास उत्साहात प्रारंभ

श्री छत्रपती शाहू साखर कारखाना येथे राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहास  उत्साहात प्रारंभ

कागल (प्रतिनिधी): श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना येथे राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचा प्रारंभ कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांच्या हस्ते ध्वजपूजन व सुरक्षा ध्वजारोहण करून उत्साहात झाला. यानिमित्त कारखान्यात आठवडाभर विविध जनजागृतीपर उपक्रम, स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

   यावेळी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण म्हणाले, सुरक्षितता ही केवळ सुरक्षा सप्ताहापुरती मर्यादित न ठेवता ती आपल्या दैनंदिन कार्यपद्धतीचा अविभाज्य भाग बनवली पाहिजे. सुरक्षिततेचे नियम पाळले नाहीत तर अपघात घडून कारखान्याचे तसेच संबंधित कर्मचाऱ्यांचे  नुकसान होऊ शकते. त्यामुळे प्रत्येकाने सुरक्षिततेचे नियम कायमस्वरूपी पाळावेत.

   कार्यक्रमात सुरक्षा शपथ वाचन एस. के. पाटील यांनी केले. सेफ्टी ऑफिसर उत्तम डोंगळे यांनी सुरक्षिततेसंदर्भातील उपाययोजना व खबरदारी याबाबत सविस्तर माहिती दिली. उपस्थित कर्मचाऱ्यांना सेफ्टी बॅचचे वितरणही करण्यात आले. तसेच कारखाना परिसरात सुरक्षिततेबाबत जनजागृतीपर बॅनर्स व पोस्टर्स लावून व्यापक जनजागृती करण्यात आली.

 स्वागत एच. आर. मॅनेजर बाजीराव पाटील यांनी केले, तर आभार सिक्युरिटी आॕफिसर शहाजी पोवार यांनी मानले.