अशोकराव माने इन्स्टिट्यूटमध्ये इंजिनिअरिंग व एमबीए प्रवेश नोंदणी सुरू
प्रतिनिधी/वाठार तर्फ वडगाव : शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठी अभियांत्रिकी पदवी आणि एमबीए अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेला (CAP) सुरुवात झाली असून, श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स येथे विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी व प्रवेश मार्गदर्शनाची मोफत सुविधा उपलब्ध आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष आणि प्रवेश प्राधिकरणाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांनी निर्धारित मुदतीत ऑनलाइन अर्ज नोंदणी, आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे, कागदपत्रांची पडताळणी करणे आणि अर्ज निश्चितीची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना या सर्व टप्प्यांबाबत योग्य मार्गदर्शन मिळावे, यासाठी महाविद्यालयामध्ये शासनमान्य अधिकृत छाननी केंद्र तसेच स्वतंत्र प्रवेश मार्गदर्शन व सुविधा केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष विजयसिंह माने यांनी दिली.

महाविद्यालयाचे कॅम्पस डायरेक्टर प्रा. पी. बी. घेवारी यांनी माहिती देताना सांगितले की, अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सला स्वायत्त दर्जा प्राप्त असून, येथे विद्यार्थीकेंद्रित अभ्यासक्रम, आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, अनुभवी प्राध्यापक, उत्कृष्ट शैक्षणिक वातावरण, संशोधन व नावीन्यपूर्ण उपक्रम, उद्योग-संस्था समन्वय आणि करिअरकेंद्रित प्रशिक्षण सुविधा उपलब्ध आहेत. शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकास, व्यक्तिमत्त्व विकास आणि रोजगारक्षमतेवर विशेष भर दिला जात आहे.
महाविद्यालयाच्या संचालक प्रा. डॉ. संगीता चौगुले म्हणाल्या, "सध्या महाविद्यालयामध्ये कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल व सिव्हील इंजिनिअरिंग तसेच एमबीए अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. यासोबतच ऑनर्स डिग्री, मल्टीडिसिप्लिनरी मायनर अभ्यासक्रम, मूल्यवर्धित प्रशिक्षण, इंटर्नशिप आणि प्रकल्पाधारित शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून दिली जात आहे. तसेच प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज नोंदणी, अभ्यासक्रम व शाखा निवड, महाविद्यालय पसंतीक्रम भरणे, आवश्यक कागदपत्रांची माहिती, शिष्यवृत्ती, विविध प्रवेश फेऱ्या आणि करिअरच्या संधी यांबाबत तज्ज्ञांकडून संपूर्ण मार्गदर्शन केले जात आहे.
विद्यार्थी आणि पालकांनी प्रवेशाबाबत अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सच्या प्रवेश मार्गदर्शन केंद्राशी प्रत्यक्ष, संकेतस्थळाद्वारे किंवा ९७६७५४११११, ९९६०२५१२७९, ९६६५१५९५५६, ९९७००२८७३७ या क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.




