साईनाथ कडून 15 टक्के लाभांश जाहीर - उत्तमराव जाधव

साईनाथ कडून 15 टक्के लाभांश जाहीर - उत्तमराव जाधव

कोल्हापूर (प्रतिनिधी) - साईनाथ मल्टीस्टेट को - ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या वतीने सभासदांना 15 टक्के लाभांश देण्यात येणार असे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष उत्तमराव जाधव यांनी केले. संस्थेने चालू आर्थिक वर्षात उत्कृष्ट कामगिरी करत 200 कोटी रुपयांच्या व्यवसायाचा टप्पा पूर्ण केला आहे. 

उत्तमराव जाधव पुढे म्हणाले, सभासदांच्या थेट खात्यावर लाभांश जमा करण्यात येणार आहे. संस्थेच्या स्थापनेपासूनच सभासदांचं हित व संस्थेची प्रगती हेच ध्येय राहिले आहे. सभासदांनी दाखवलेला विश्वास आणि सहकार्यामुळेच अल्पावधीतच साईनाथ मल्टीस्टेट सातत्याने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे.  भविष्यातही अधिक लाभदायक योजना व सेवांसाठी प्रयत्नशील राहो अशी ग्वाही जाधव यांनी यावेळी दिली.