एकनाथ शिंदेंसोबत मराठी अभिनेत्रींनी साजरं केलं रक्षाबंधन; दीपाली सय्यद, किशोरी शहाणे, विशाखा सुभेदारांसह कोणकोण उपस्थित?
मुंबई (प्रतिनिधी) : रक्षाबंधनाच्या पवित्र आणि स्नेहपूर्ण निमित्ताने मराठी चित्रपट आणि मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आज ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राखी बांधणार आहेत. हा विशेष रक्षाबंधन सोहळा आज, २८ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता 'आनंद आश्रम', टेंभी नाका, चरई, ठाणे येथे उत्साहात पार पडणार आहे.

या विशेष सोहळ्याला मराठी कलाविश्वातील अनेक अभिनेत्री आणि सेलिब्रिटी उपस्थित राहून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देणार आहेत.दीपाली सय्यद, स्मिता गोंदकर, किशोरी शहाणे विज, विशाखा सुभेदार, शर्मिष्ठा राऊत, गिरिजा प्रभू, जान्हवी किल्लेकर, नम्रता गायकवाड, अर्चना नेवरेकर, नियती राजवाडे, नंदिनी वैद्य, सुषमा जयवंत आणि मानसी इंगळे या अभिनेत्री या सोहळ्याला उपस्थित होत्या.
टेंभी नाक्यावरील ऐतिहासिक 'आनंद आश्रम' येथे आयोजित करण्यात आलेल्या या रक्षाबंधन सोहळ्यामुळे राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रातील स्नेहबंध अधिक दृढ होणार असल्याचं पाहायला मिळत आहे. मराठी कलाविश्वातील अभिनेत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील हा रक्षाबंधन सोहळा ठाण्यातील राजकीय आणि सांस्कृतिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.




