कोकणात पावसाचे तांडव; कशेडी घाटात दरड कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्ग ठप्प, ताम्हिणी मार्गही बंद
मुंबई: कोकणात गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, वाहतूक वस्थेला मोठा फटका बसला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील खेड-पोलादपूर दरम्यान असलेल्या कशेडी घाटात आज (६ जुलै) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अचानक दरड कोसळली. नव्या महामार्गावर मोठ्या प्रमाणावर माती आणि दगड आल्यामुळे या मार्गावरील वाहतूक तात्पुरती पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. कशेडी घाटातील वाहतूक आता महाड-विन्हेरी मार्गावरून वळवण्यात आली आहे.





