खोपी गावाच्या हद्दीत एसटीचा अपघात; चालकाचे नियंत्रण सुटल्याने डीवायडर तोडून बस गटरात

खोपी गावाच्या हद्दीत एसटीचा अपघात; चालकाचे नियंत्रण सुटल्याने डीवायडर तोडून बस गटरात

पुणे (प्रतिनिधी) : पुणे - सातारा महामार्गावर खेडशिवापूर टोल नाक्याच्यानजीक खोपी गावाच्या हद्दीत एक अपघाताची घटना घडली आहे. यात भरधाव एसटी बस रस्त्याकडेच्या गटरात कलल्याने अपघात झाल्याची घटना घडली आहे.हि बस साताऱ्याहून मुंबई सेंट्रलला चालली असताना अपघात झाल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डीवायडर तोडून बस थेट गटरात शिरली. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला.सुदैवाने यात कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. मात्र बसमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने जात असताना बसचा हा अपघात झालाय.

अपघातात बस मुख्य रस्ता आणि सेवा रस्त्याच्या मधोमध असणाऱ्या गटरात जाऊन अडकली. सुदैवाने बस पूर्णपणे पलटी न झाल्याने मोठा अनर्थ टळलाय. अपघातानंतर स्थानिकांनी आणि महामार्गावर प्रवास करणाऱ्या इतर प्रवाश्यांना बसमधील प्रवाश्यांना सुखरूप बाहेर काढले.