गोपाळ कृष्ण गोखले कॉलेजचा बारावी निकाल ९७.२८ टक्के

गोपाळ कृष्ण गोखले कॉलेजचा बारावी निकाल ९७.२८ टक्के

कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील गोपाळ कृष्ण गोखले कॉलेजने बारावी परीक्षेत उज्ज्वल यश मिळवले असून विज्ञान शाखेचा निकाल ९७.२८ टक्के लागला आहे. अन्य शाखांमधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. विज्ञान शाखा (निकाल ९७.२८ टक्के): श्रुती खाडे (९३.३३ टक्के), आदिती धनवडे (८४.३३ टक्के), असीम निरंकारी (८३ टक्के). कला शाखा (निकाल ७३.८६ टक्के): उत्कर्षा गुरव (८३ टक्के), ऋतुजा मुद्राळे (७० टक्के), शुभम पाटील (६३.५० टक्के).

वाणिज्य शाखा (निकाल ६१.१६ टक्के) : सचिन यादव (६८.३३ टक्के), यश व्हनुरे (६८.१७ टक्के), श्रेया मिस्त्री (६४.८३ टक्के)

एच.एस.व्ही.सी. (HSVC) शाखा (निकाल ८८.४६ टक्के): संस्कार रेडेकर (६६.५० टक्के), सोहम माळी (६६.१७ टक्के), अक्षरा देवेकर (६५.३३ टक्के).

कॉलेजचा भूशास्त्र विषयाचा निकाल १०० टक्के लागला असून, १३ विद्यार्थ्यांनी या विषयात १०० पैकी १०० गुण मिळवले आहेत. या यशस्वी विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी जयकुमार देसाई, चेअरमन प्रा. डॉ. मंजिरी मोरे, पेट्रन कौन्सिल सदस्य दौलत देसाई, प्रशासन अधिकारी पृथ्वी मोरे, प्र. प्राचार्य डॉ. आर. बी. भुयेकर आणि पर्यवेक्षक एम. एल. धनवडे यांनी अभिनंदन केले.