दसरा चौक ते संभाजीनगर खराब रस्त्यांचे काम गतीने पूर्ण करा - अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ

दसरा चौक ते संभाजीनगर  खराब रस्त्यांचे काम गतीने पूर्ण करा - अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ

कोल्हापूर (प्रतिनिधी) - महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेंतर्गत दसरा चौक ते संभाजीनगर मार्गावरील खराब झालेल्या रस्त्याचे काम गतीने पूर्ण करण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी दिल्या. रस्त्याचा वरचा लेअर खराब झाला असून, तो पूर्णपणे काढून नवा लेअर टाकण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या. काम करताना धुळीचे प्रदूषण होऊ नये, यासाठी दक्षता घेण्याचे आदेशही त्यांनी दिले.

दसरा चौक ते संभाजीनगर रस्त्याच्या कामाचे कन्सल्टंटकडून वेळोवेळी डांबराचे नमुने तपासून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले.

त्यानंतर परीख पूल परिसरातील प्रस्तावित काँक्रिट रस्त्याच्या कामाची पाहणी करून संबंधित ठेकेदाराला लाईन आऊट देऊन तातडीने काम सुरू करण्यासह वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, यासाठी योग्य ते नियोजन करण्याचेही आदेश त्यांनी दिले. रेल्वे फाटकाजवळील फूटवेअर ब्रिजच्या कामाची पाहणी करून ब्रिजचे मार्किंग व लाईन आऊट तातडीने करून देण्याच्या सूचना शहर अभियंता रमेश मस्कर यांना दिल्या.

यावेळी उपशहर अभियंता अरुण गुजर, कनिष्ठ अभियंता प्रमोद बराले, उपशहर अभियंता सुरेश पाटील, कनिष्ठ अभियंता सागर शिंदे, ठेकेदार कंपनीचे मॅनेजर सत्तार मुल्ला, कन्सल्टंट अविनाश कसबेकर, मीरा नगीमे, ठेकेदार अनिल पाटील आदी उपस्थित होते.