पद्मश्री डॉ. शिवराम भोजे यांच्या कुटुंबियांचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून सांत्वन

पद्मश्री डॉ. शिवराम भोजे यांच्या कुटुंबियांचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून सांत्वन

कोल्हापूर (प्रतिनिधी) - सुप्रसिद्ध अनुशास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. शिवराम भोजे यांच्या कुटुंबीयांचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांत्वन केले. पद्मश्री डाॅ. भोजे यांच्या कोल्हापुरातील निवासस्थानी मंत्री मुश्रीफ यांनी ही सांत्वनपर भेट दिली. 

      

यावेळी मंत्री मुश्रीफ म्हणाले,  कागल तालुक्यातील कसबा सांगाव येथे जन्मलेल्या आणि वाढलेल्या ज्येष्ठ अनुशास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. शिवराम भोजे यांनी भारत मातेसाठी अनमोल योगदान दिले आहे. ते कागल तालुक्याचे सुपुत्र आहेत, याचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे. त्यांच्या निधनामुळे भारत देश एका अभ्यासू आणि कर्तबगार अनुशास्त्रज्ञ संशोधकाला मुकला आहे. भारतमातेसाठी त्यांनी अनुभट्टी तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये ४० वर्षाहून अधिक महत्वपूर्ण योगदान दिले आहे. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा समितीचे सदस्य म्हणून त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील उल्लेखनीय सेवा व योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना पद्मश्री हा पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.

यावेळी पद्मश्री डाॅ. भोजे यांच्या पत्नी उमा, तिन्ही मुली वर्षा, विद्या व वीणा, जावई अमित व गिरीश आदी कुटुंबीय उपस्थित होते. तसेच, राजेंद्र माने, नेमिनाथ चौगुले, उमेश माळी व ग्रामस्थ उपस्थित होते.