राजर्षि शाहू गव्हर्मेंट सर्व्हटस् बँक व एम्प्लॉईज युनियन यांच्यात " सात टक्के " पगारवाढीचा वेतन करार

राजर्षि शाहू गव्हर्मेंट सर्व्हटस् बँक व एम्प्लॉईज युनियन यांच्यात " सात टक्के " पगारवाढीचा वेतन करार

कोल्हापूर (प्रतिनिधी) - कोल्हापूर येथील राजर्षि शाहू गव्हर्मेंट सव्र्व्हटस को-ऑप बँक लि., कोल्हापूर व बँक एम्प्लॉईज युनियन, कोल्हापूर यांचेदरम्यान "सात टक्के " कर्मचारी पगारवाढीचा करार आज पूर्ण करण्यात आला. यात बँकेने सरसकट " सात टक्के " पगारवाढ देणेचे मान्य केले असून बँक कर्मचाऱ्यांना भरघोस वाढ मिळणार आहे.

बँक व्यवस्थापनाचे संचालक मंडळ व बँक एम्प्लॉईज युनियन, कोल्हापूरचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक गुरुवार 04 सप्टेंबर रोजी बँकेचे शाहुपुरी येथील प्रधान कार्यालयामध्ये पार पडली. त्यात बँकेचे अध्यक्ष रोहित रोहिणी प्रकाश बांदिवडेकर व संघटनेचे अध्यक्ष अतुल दिघे यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यात कर्मचाऱ्यांनी बँकेच्या प्रगतीसाठी एकमेकांचे सहकार्याने काम करण्याचे ठरले.

बँकेच्या वतीने करारावर अध्यक्ष रोहित रोहिणी प्रकाश बांदिवडेकर, उपाध्यक्ष सदानंद रुक्मिणी वसंतराव घाटगे, संचालक रविंद्र सुशिला वसंतराव पंदारे, शशिकांत शांताबाई दिनकर तिवले, मधुकर आंबुबाई श्रीपती पाटील (एम्.एस्) व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश सुलोचनादेवी रामराव शिंदे यांनी, तर बँक एम्प्लॉईज युनियन, कोल्हापूर यांचेवतीने अध्यक्ष अतुल दिघे, महासचिव नारायण मिरजकर, सचिव प्रकाश जाधव यांनी सह्या केल्या.

दरम्यान वेतनकराराची अंमलबजावणी 01 जुलै 2025 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार आहे. नवीन वेतन कराराने वाढलेल्या पगाराची फरक रक्कम कर्मचाऱ्यांना एकरकमी मिळणार आहे.