लोकशाहीर अण्णा भाऊसाठे हे जागतिक किर्तीचे साहित्यीक होते - आ. रोहित पवार
सांगली (प्रतिनिधी) - लोकशाहीर अण्णा भाऊसाठे हे जागतिक किर्तीचे साहित्यीक होते. समाजातील उपेक्षीत घटकांना त्यांनी लेखणीतून समाजासमोर आणले असे प्रतिपादन आमदार रोहीत पवार यांनी केले.

वाटेगांव (ता. वाळवा) येथे कर्जत - जामखेड मतदार संघाचे राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पक्षाचे आमदार रोहीत पवार यांचे कडून लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या कुटुंबियांना वास्तू अर्पण करण्यात आली. याप्रसंगी ते बोलत होते .
गतवर्षी आ. रोहीत पवार यांनी अप्णा भाऊंच्या कुटुंबांला भेट देऊन नविन वास्तु उभारण्याचा संकल्प केला होता. या वास्तुचे अर्पण आज संपन्न झाले.
आ. रोहीत पवार पुढे म्हणाले की, शासनाच्या वतीने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या होणाऱ्या स्मारक कमिटीत अप्णा भाऊंच्या कुटुंबातील दोन सदस्यांचा समावेश व्हावा.
या प्रसंगी स्वागत - प्रास्ताविक सौरभ साठे यांनी केले. यावेळी सचिन साठे सुवर्णा जाधव, प्रकाश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी माजी सरपंच सुरेश साठे , राहूल चव्हाण, डॉ. भूषण चौगुले , समीर जाधव, राजू पाटील, अण्णा भाऊंच्या स्नुषा श्रिमती सावित्री साठे ,नातु सचिन साठे, सरपंच नंदाताई चौगुले , उपसरपंच सोनाली पाटील ,माजी सभापती सुवर्णा जाधव यांच्यासह आदी प्रमुख उपस्थित होते .




