लोहगड किल्ल्यावर व्यावसायिकाच्या मृत्यूचे गूढ उलगडले; धक्कादायक कारण समोर
पुणे प्रतिनिधी : लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगदरम्यान दरीत पडून मृत्यू झाल्याचे मानले जात असलेल्या तरुण व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे. लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या तपासात हा अपघात नसून नियोजित कटाचा भाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

केतन अग्रवाल हे नामांकित व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचे पुत्र होते. त्यांचा विवाह मसाला व्यवसायाशी संबंधित गोयल कुटुंबातील सिया गोयल हिच्याशी निश्चित झाला होता. जयपूर येथे हा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडणार होता आणि त्यासाठी विशेष विमानांचीही व्यवस्था करण्यात आली होती.तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, सियाला हा विवाह मान्य नव्हता. याच पार्श्वभूमीवर केतन यांना कायमचे दूर करण्याचा सिया गोयल हिने कट रचला
लग्नच्या आधी सियाचा वाढदिवस असल्याने ती आणि केतन लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेले होते. सुरुवातीला फोटो काढताना केतन यांचा पाय घसरून ते दरीत कोसळल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र, सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी तपासाची दिशा बदलली.तपासादरम्यान सियाच्या मित्राने केतन यांना दरीत ढकलल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेत सियाची नेमकी भूमिका काय होती, तसेच या कटात इतर कोणाचा सहभाग होता का, याचा शोध सुरू आहे. या प्रकरणाच्या उलगड्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.




