शरद आयुर्वेद हॉस्पिटमध्ये मंगळवारी मोफत आरोग्य शिबिर

शरद आयुर्वेद हॉस्पिटमध्ये मंगळवारी मोफत आरोग्य शिबिर

यड्राव (प्रतिनिधी) : यड्राव येथील शरद आयुर्वेद मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्यावतीने मंगळवार दि १२ रोजी मोफत सर्वरोग तपासणी व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेचे अध्यक्ष आमदार डॉ. राजेंद्र पाटील (यड्रावकर) यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच राष्ट्रीय परिचारिका दिनाचे औचित्य साधून हे शिबिर होत आहे. 

शिबिर सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत महाविद्यालयाच्या रुग्णालय परिसरात होणार असून विविध आजारांवरील तपासणी, मार्गदर्शन व उपचार सल्ला नागरिकांना मोफत उपलब्ध करून दिला जाणार आहे.

शिबिरामध्ये मेटाबॉलिक सिंड्रोम, मधुमेह, कोलेस्टेरॉल, महिला आरोग्य, सांधे व पाठदुखी, तणाव व झोप विकार, पचनसंस्था विकार, त्वचा व केस आरोग्य, गुदमार्ग व अॅनो-रेक्टल रोग, पंचकर्म, कान-नाक-घसा व नेत्र तपासणी, वजन नियंत्रण, बालकांसाठी सुवर्णप्राशन तसेच ज्येष्ठ नागरिक आरोग्य तपासणी होणार आहे. तसेच तज्ञ डॉक्टरांकडून उपचार मार्गदर्शन मिळणार आहे.

याशिवाय ब्लड शुगर, ब्लड प्रेशर, बॉडी कॉम्पोझिशन, SpO2 आणि ECG या तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत. तसेच प्रकृती परीक्षण, आहार मार्गदर्शन आणि नाडी परीक्षण यांचाही लाभ नागरिकांना घेता येणार आहे. तरी या आरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शरद आयुर्वेद हॉस्पिटलच्या आयोजकांनी केले आहे.