शाळांमध्ये ‘पिंक रूम’ : किशोरींच्या आरोग्य, सन्मान आणि शिक्षणासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम
कोल्हापूर (प्रतिनिधी) - किशोरवयीन मुलींना वयात येताना शारीरिक, मानसिक व भावनिक बदलांना सामोरे जावे लागते. या काळात स्वच्छता, गोपनीयता आणि आत्मसन्मान जपण्यासाठी शासनाकडून शाळांमध्ये ‘पिंक रूम’ ची संकल्पना राबविण्यात येत आहे. मासिक पाळीच्या काळात सॅनिटरी नॅपकिन बदलणे, आवश्यक असल्यास थोडी विश्रांती घेणे तसेच कपडे बदलण्यासाठी सुरक्षित व गोपनीय जागा उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. पिंक रूममुळे किशोरींना गोपनीयतेचे सुरक्षित वातावरण मिळते. मासिक पाळीदरम्यान योग्य स्वच्छता पाळण्याची सवय लागते. क्रीडा, योग व पीटी तासांसाठी कपडे बदलण्याची सुविधा मिळते. यासोबतच मुलींमध्ये आत्मविश्वास, स्वाभिमान आणि सुरक्षिततेची भावना निर्माण होते.

आवश्यक सोयी - सुविधा -
उच्च प्राथमिक शाळांमध्ये स्वतंत्र खोली किंवा उपलब्ध वर्गखोलीचे विभाजन करून पिंक रूम तयार केली जाते. खोली किमान 15x15 फूट (जागा असल्यास 18x22 फूट) आकाराची, पिंक रंगाने सजवलेली असावी. दुरुस्त दरवाजा व पडदा, खुर्ची-टेबल, आरसा, स्टील कॉट/बेड, गादी व उशी, स्वच्छ पिण्याचे पाणी, सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन व डिस्पोजल व्यवस्था, चांगले वायुविजन, प्रकाश, फॅन, सुरक्षित खिडकी व योग्य लॉकची सोय आवश्यक आहे. खोलीबाहेर ‘पिंक रूम’चा फलक लावणे व नियमित स्वच्छता व तपासणीही महत्त्वाची आहे.
निधीची उपलब्धता -
लोकसहभाग, माजी विद्यार्थी संघ, गावातील दातृत्वान व्यक्ती व संस्था, तसेच १५वा वित्त आयोग आदी स्रोतांमधून निधी उभारता येतो.
फायदे -
या उपक्रमामुळे किशोरींच्या आरोग्य शिक्षणास, मासिक पाळी व्यवस्थापनास आणि स्वच्छतेविषयी जागरूकतेस चालना मिळते. शाळेत येताना अस्वस्थता किंवा संकोच कमी होऊन मुलींची उपस्थिती वाढते आणि शिक्षणात सातत्य राहते.
अंमलबजावणी -
शाळांतील अतिरिक्त वर्गखोल्यांची माहिती घेऊन, CSR निधी, लोकसहभाग, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, महिला व बालकल्याण विभाग यांच्या योजनांतर्गत निधीचा वापर करता येतो. महिला शिक्षिका, आरोग्य सेविका, आशा व अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून आरोग्य शिबिरे घेऊन मुली, शिक्षक व पालकांमध्ये संवेदनशीलता वाढवली जाते.
पिंक रूमबद्दल तालुक्यातील शाळांचा अहवाल पुढीलप्रमाणे -




