'श्रद्धा इन्स्टिट्यूट'च्या गुणवंतांचा ऐतिहासिक महा-सत्कार; २१ विद्यार्थी IIT तर २९ विद्यार्थी NIT मध्ये

'श्रद्धा इन्स्टिट्यूट'च्या गुणवंतांचा ऐतिहासिक महा-सत्कार; २१ विद्यार्थी IIT तर २९ विद्यार्थी NIT मध्ये

इचलकरंजी (प्रतिनिधी) : पश्चिम महाराष्ट्रात शैक्षणिक गुणवत्तेचा स्वतंत्र ब्रँड निर्माण केलेल्या 'श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ करिअर डेव्हलपमेंट'च्या वतीने मंगळवार, १४ जुलै २०२६ रोजी इचलकरंजी शहरात 'गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा २०२६' अत्यंत उत्साहात पार पडला. या सोहळ्यात संस्थेच्या तब्बल २१ विद्यार्थ्यांनी देशातील सर्वोच्च IIT संस्थांमध्ये, २९ विद्यार्थ्यांनी नामांकित NIT संस्थांमध्ये, तर ०९ विद्यार्थ्यांनी IIIT मध्ये आपले स्थान पक्के केले आहे. तसेच ८० विद्यार्थ्यांनी ९९ पेक्षा जास्त पर्सेंटाईल (99+ Percentile) मिळवून नवा इतिहास रचला आहे.

या सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे माजी कुलगुरू आणि थोर शिक्षणतज्ज्ञ प्रा. माणिकराव साळुंखे व प्रा. लक्ष्मण केरीपाळे उपस्थित होते. याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांना महाराष्ट्राचा पारंपरिक फेटा बांधून आणि पाद्यपूजन करून अत्यंत आदराने सन्मानित करण्यात आले. आपल्या पाल्यांचा हा अभूतपूर्व गौरव पाहून अनेक माता-पित्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. माणिकराव साळुंखे म्हणाले, "श्रद्धा इन्स्टिट्यूटमध्ये केवळ JEE, NEET आणि MHT-CET ची तांत्रिक तयारीच करून घेतली जात नाही, तर विद्यार्थ्यांच्या संवेदनशील मनावर उत्तम संस्कार आणि मानवी मूल्ये रुजवली जातात." त्यांनी विद्यार्थ्यांना आयुष्यात यशस्वी होण्यासाठी 'ज्ञान, कठोर परिश्रम आणि उत्तम चारित्र्य' या त्रिसूत्रीचा कानमंत्र दिला. तसेच, आजचे युग हे AI (कृत्रिम बुद्धिमत्ता), रोबोटिक्स आणि मशीन लर्निंगचे आहे. या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर मानवी कल्याणासाठी व देशाच्या पर्यावरणपूरक प्रगतीसाठी कसा करता येईल, यावर विद्यार्थ्यांनी संशोधन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

या ऐतिहासिक सोहळ्याने पश्चिम महाराष्ट्राच्या शैक्षणिक इतिहासात एक सुवर्णक्षण नोंदवला असून, संस्थेच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.यावेळी श्रद्धा इन्स्टिट्यूट चे अध्यक्ष डॉ. ए. आर. तांबे, समन्वयक सुप्रिया कौंदाडे, संगीता पवार, अभिषेक तांबे, सृष्टी तांबे यांच्यासह विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.