सचिन अहिर शिंदेंच्या शिवसेनेत, ठाकरेंनी उभा केला दुसरा सचिन; पुणे संपर्कप्रमुखपदी सचिन पडवळ यांची निवड
मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २०२९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने संघटनात्मक बदल करण्यास सुरुवात केली आहे. सचिन अहिर यांनी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेत मोठे बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे.सचिन अहिर यांच्या जागी आता सचिन पडवळ यांच्यावर पुणे जिल्हा संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यापूर्वी पुणे जिल्हा संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी सचिन अहिर यांच्याकडे होती. आता ही जबाबदारी सचिन पडवळ यांच्यावर देण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यातील बारामती विधानसभा मतदारसंघासह तब्बल २१ विधानसभा मतदारसंघांच्या समन्वयाची महत्त्वाची जबाबदारी सचिन पडवळ यांच्यावर सोपवण्यात आली आहे. २०२९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संघटनेत महत्त्वाचे फेरबदल केले आहेत. सचिन अहिर यांनी पक्षांतर करून शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षात प्रवेश केल्यानंतर पुणे जिल्ह्याची मोठी जबाबदारी सचिन पडवळ यांच्याकडे देण्यात आली आहे.
यापूर्वी पुणे जिल्हा संपर्कप्रमुख पदाची धुरा सांभाळणाऱ्या सचिन अहिर यांच्या जागी आता सचिन पडवळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नव्या संघटनात्मक रचनेनुसार पडवळ यांच्याकडे बारामती मतदारसंघासह पुण्यातील २१ विधानसभा मतदारसंघांच्या समन्वयाची जबाबदारी असेल.आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्याच्या दृष्टीने हे बदल महत्त्वाचे मानले जात आहेत.
दरम्यान, सचिन अहिर यांच्या शिंदे शिवसेनेतील प्रवेशामुळे आदित्य ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. वरळी मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन विधान परिषदेचे आमदार होते, त्यापैकी सचिन अहिर हे एक होते.गेल्या काही दिवसांपासून सचिन अहिर यांना शिंदे शिवसेनेकडून पक्षप्रवेशाची ऑफर देण्यात आल्याची माहिती समोर आली होती. मात्र, खासदार संजय दिना पाटील यांच्या प्रवेशानंतर सचिन अहिर हे शिंदे शिवसेनेत जाण्यासाठी तयार झाल्याची माहिती समोर आली.
विधान परिषदेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे शिवसेनेकडून सचिन अहिर यांना उपसभापती पदाची संधी देण्याचं आश्वासन देण्यात आल्याची माहिती आहे. त्यानंतर सचिन अहिर यांनी तातडीने शिंदे शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचं समोर येत आहे. आता सचिन अहिर शिंदेंच्या शिवसेनेत गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पुण्याची जबाबदारी दुसऱ्या सचिनकडे सोपवल्याने राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.




