जिल्हा परिषद कोल्हापूरमध्ये महर्षी वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी

जिल्हा परिषद कोल्हापूरमध्ये महर्षी वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी

कोल्हापूर (प्रतिनिधी) - जिल्हा परिषद कोल्हापूरतर्फे महर्षी वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांनी भूषवले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र) ओमप्रकाश यादव उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या वतीने करण्यात आले होते.

या कार्यक्रमात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. कार्यक्रमा दरम्यान उपस्थितांनी समाजात समता, न्याय आणि ज्ञानाचा दीप प्रज्वलित ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला.

कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद च्या तळमजल्यावरील मुख्य प्रवेशव्दाराजवळ करण्यात आला या कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेने महर्षी वाल्मिकींच्या जीवनातील प्रेरणादायी मूल्यांचा प्रसार करण्याचा संदेश दिला.