दीपावली सणाच्या अनुषंगाने वाहतुकीच्या मार्गात 'हे' बदल

दीपावली सणाच्या अनुषंगाने वाहतुकीच्या मार्गात 'हे' बदल

कोल्हापूर (प्रतिनिधी) - कोल्हापूर शहरात १७ ऑक्टोंबर ते २३ ऑक्टोंबर अखेर मोठया प्रमाणात दिपावली सण साजरा होणार आहे. दीपावली पुर्व खरेदी करीता १२ ऑक्टोंबर पासून नागरीकांची गर्दी महाद्वार रोडवरील दुकांनामध्ये खरेदी विक्री करीता मोठ्या प्रमाणात होत असते. तसेच दिपावलीच्या सलग सुट्या असल्याने श्री अंबाबाई देवीचे दर्शनाकरीता महाराष्ट्र राज्यातून व इतर राज्यातून मोठया प्रमाणात भाविक आप - आपल्या मोटार वाहनांनी येत असतात. त्या परिसरातील वाहतुक सुरळीत व सुरक्षित रहावी, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून नागरिकांची व भाविकांना रस्ता सुरक्षा प्रस्थापित होणे आवश्यक असल्याने पोलीस अधीक्षक यांनी दिपावली उत्सव कालावधीत चारचाकी वाहनांना प्रवेश बंद करण्याबाबत निर्देश दिले आहेत.

(पोलीस वाहन, फायर बिग्रेड व अॅम्ब्युलन्स यांना वगळून)

वाहतूकीसाठी प्रवेश बंद करण्यात आलेले मार्ग -

१. बिनखांबी गणेश मंदिर ते पापाची तिकटी पर्यत चारचाकी वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे. (पोलीस वाहन, फायर बिग्रेड व अॅम्ब्युलन्स यांना वगळून)

२. भाऊसिंगजी रोड वरुन गुजरी गल्ली येथे जाणेस सर्व प्रकारच्या चारचाकी वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे.

महाव्दार रोडला मिळणारे खालील रस्ते डावीकडे/उजवीकडे वळण्यास प्रवेश बंद 

१. वांगी बोळ मधुन येवुन डावे बाजुस वळणेस प्रवेश बंद

२. ताराबाई रोडने येवुन महालक्ष्मी चौक येथुन डावे बाजुस वळणेस प्रवेश बंद

३. बाबु जमाल रोडकडुन येवुन डावे बाजुस वळणेस प्रवेश बंद

४. कसबा गेट पोलीस चौकीकडुन येवुन डावे बाजुस वळणेस प्रवेश बंद

५. दत्त गल्लीमधुन येवुन डावे बाजुस वळणेस प्रवेश बंद

वळविण्यात आलेले मार्ग -

सरस्वती टॉकीज चौकातुन ताराबाई रोडने महाव्दार रोडकडे येणारी वाहतूक पुढे न जाता बाबू जमाल दर्गा किंवा अर्ध छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गाने जाईल.

वरील सर्व मार्ग शहरात १२ ऑक्टोंबर २३ ऑक्टोंबरपर्यंत वरील प्रमाणे प्रवेश बंद व मार्ग वळविण्यात आलेले आहेत.