पार्कीग झोन/नो हॉकर्स झोन प्रायोगिक तत्वावर जाहीरनामा
कोल्हापूर (प्रतिनिधी) - कोल्हापूर शहरामधील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयासमोर असलेल्या जुन्या न्यायालयाच्या इमारतीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्कीट बेंचचे प्रत्यक्ष कामकाजास दिनांक १८ ऑगस्ट रोजी पासून सुरवात होणार आहे. सदर न्यायालय परिसरामध्ये छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय, नियोजीत करवीर तहसिलदार कार्यालय, दैनिक पुढारी वृत्तपत्राचे कार्यालय, कोल्हापूर महानगरपालिका, इतर शासकीय कार्यालय असलेने नागरीक सदर ठिकाणी आपले नित्याचे कामकाजासाठी वाहनाचा वापर करीत असतात. सदर परिसरामध्ये वाहनधारक हे आपली वाहने रस्त्याच्या दुतर्फा अस्ताव्यस्तपणे उभी करतात. त्यामुळे इतर वाहनांना अडथळा निर्माण होतो, तरी सदर परिसरात वाहतूक कोंडी होवू नये व परिसरातील वाहतुक सुरळीत व सुनिश्चित राहणे आम जनतेच्या सोईसाठी आवश्यक आहे.

सदर वाहतुक नियोजनाबाबत नागरिक, रहिवाशी व वाहन चालकांनी सहकार्य करावे. या विषयांबाबत सुचना अथवा हरकती असल्यास त्या पोलीस अधीक्षक, कार्यालय कोल्हापूर व शहर वाहतुक नियंत्रण शाखा, कोल्हापूर यांचे कार्यालयाकडे सदरचा जाहिरनामा प्रसिध्द झाल्यापासून १५ दिवसापर्यंत पाठवाव्यात. त्यानंतर प्राप्त सुचना अगर हरकती यांचा विचार करुन पुढील निर्देश दिले जातील.
नो पार्कींग/नो हॉकर्स झोन :-
सीपीआर हॉस्पीटल ते नियोजीत तहसिल कार्यालय पर्यंत मार्गावरील रस्त्याचे दोन्ही बाजुस सर्व वाहनांकरीता नो पार्कींग झोन/नो हॉकर्स झोन करण्यात येत आहे.
सीपीआर हॉस्पीटल ते दसरा चौक पर्यंत मार्गावरील रस्त्याचे दोन्ही बाजुस सर्व वाहनांकरीता नो पाकींग झोन/नो हॉकर्स झोन करण्यात येत आहे.
सीपीआर हॉस्पीटल ते सिध्दार्थनगर कमान पर्यंत मार्गावरील रस्त्याचे दोन्ही बाजुस सर्व वाहनांकरीता नो पार्कींग झोन/नो हॉकर्स झोन करण्यात येत आहे.
(सदर वाहतूक नियंत्रण अधिसुचना पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, ग्रीन कॅरीडोर, ऑक्सिजन गॅस वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाही.)
वरील निर्देश हे १७ ऑगस्ट ते ०१ सप्टेंबर रोजी अखेर लागू असून सदरचा जाहिरनामा नमुद मुदतीमध्ये प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येत आहे.




