शरद कृषीच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय आव्हान शिबिरासाठी निवड

शरद कृषीच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय आव्हान शिबिरासाठी निवड

जैनापूर -  जैनापूर येथील शरद कृषी महाविद्यालयमधील राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक वसीम मन्सूर फकीर याची राजभवनाद्वारे आयोजित राज्यस्तरीय आंतर विद्यापीठ आव्हान २०२५-२६ प्रशिक्षण शिबिरात निवड झाली आहे.  

आकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे १७ ते २४ जानेवारी काळात आव्हान राज्यस्तरीय शिबिर होत आहे. त्यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संघामध्ये त्याची निवड झाली आहे. त्या निवडीबद्दल संस्थेचे चेअरमन आमदार डॉ. राजेंद्र पाटील (यड्रावकर), संस्थेचे एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. 

यशस्वी विद्यार्थ्याला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सारिका कोळी, उपप्राचार्य प्रा. संजय फलके, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. दादासाहेब मगदूम यांचे मार्गदर्शन लाभले.