शरद कृषी महाविद्यालयाचे मैदानी स्पर्धेत यश
जैनापूर - जैनापूर येथील शरद कृषी महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रगती संतोष कर्नाळे हिने ८०० मीटर धावणे या स्पर्धेत व्दितीय क्रमांक मिळविला.

सांगली येथील छत्रपती शाहू महाराज कृषी व्यवसाय व्यवस्थापन येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत आंतर महाविद्यालयीन मैदानी स्पर्धा पार पडल्या. यामध्ये प्रगतीने यश मिळविले. तिला प्राचार्य डॉ. सारिका कोळी, क्रीडा शिक्षक दादासाहेब मगदूम यांचे मार्गदर्शन लाभले.
संस्थेचे चेअरमन आ. डॉ. राजेंद्र पाटील (यड्रावकर), व एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी अभिनंदन केले.




