श्रुती कुंभार यांची सहकारी अधिकारी (श्रेणी 2) पदी निवड

श्रुती कुंभार यांची सहकारी अधिकारी (श्रेणी 2) पदी निवड

कागल (प्रतिनिधी) - श्रुती अण्णासाहेब कुंभार रा. कागल ( रा. करड्याळ, ता.कागल) यांची महाराष्ट्र शासन सहकार विभाग अंतर्गत विभागीय सहनिबंधक  सहकारी संस्थां कोल्हापूर या विभागाकडे सहकारी अधिकारी श्रेणी - 2 पदी  निवड झाली आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात सहकार विभागामार्फत सरळ सेवा भरती प्रक्रिया अंतर्गत या पदाची परीक्षा घेण्यात आली होती. त्यामधून त्यांची निवड झाली आहे. विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर विभाग कोल्हापूर यांच्याकडील नियुक्तीचे पत्र त्यांना मिळाले आहे. अभ्यासातील सातत्य आणि कष्ट करण्याची जिद्द यामुळेच हे यश प्राप्त झाले आहे.

मागील वर्षी त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बाल विकास प्रकल्प " सरळ सेवा भरती अंतर्गत " सुपरवायझर " या  पदाच्या परीक्षेत यश संपादन केले होते.   त्या सध्या एकात्मिक बालविकास प्रकल्प गडहिंग्लज यांच्याकडे कार्यरत आहेत. एकाच वर्षात दोन परीक्षेत त्यांनी  यश संपादन केले आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.