हसरा चेहरा अन् तुफान एनर्जी; कॅन्सरशी झुंज देत दिमाखात परतली मराठमोळी अभिनेत्री
मुंबई (प्रतिनिधी) : 'सेक्रेट गेम्स' या वेब सिरीजमधून आपल्या अभिनयाने घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री राजश्री देशपांडे सध्या चर्चेत आहे.काही दिवसांपूर्वी तिला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं होतं. नुकतीच तिच्यावर एक मोठी शस्त्रक्रिया झाली आहे. याविषयी काही दिवसांपूर्वी तिने अपडेट शेअर केली होती.

यशस्वी शस्त्रक्रियेनंतर ती बरी होत असल्याचा तिने सांगितलेलं. आजारपणातून बाहेर पडत असणारी ही मराठमोळी अभिनेत्री आता मोठ्या दिमाखात परतली आहे.राजश्री 'बाप्या' या मराठी सिनेमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये स्क्रीनिंग आणि अनेक पुरस्कार या चित्रपटाने मिळवलेत. आता हा चित्रपट प्रेक्षकांसमोर येण्यासाठी सज्ज आहे .
या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चच्या इव्हेंटला राजश्री देशपांडेने हजेरी लावली होती. नुकतीच आजारपणातून बाहेर आलेली की अभिनेत्री इतक्या ग्रेसफुली समोर आली की चहात्यांनाही विश्वास बसेना.चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि तिच्यातील अफाट एनर्जीने पाहणारे सगळेच भारावले होते .
अनेक महिन्यांनी ती सर्व कलाकारांना भेटली .सगळ्यांशी हसून खेळून बोलली .उपस्थितांचे मनापासून स्वागत केलं . तिचा सकारात्मक वावर अनेकांना प्रेरणा देऊन जाणारा होता .




