New Institute of Technology Kolhapurच्या विद्यार्थ्यांची माऊली ट्रकिंगला औद्योगिक भेट; महिंद्राच्या व्यावसायिक वाहनांची घेतली प्रत्यक्ष माहिती
कोल्हापूर (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांना ऑटोमोबाईल उद्योगातील प्रत्यक्ष कार्यपद्धती, आधुनिक व्यावसायिक वाहने, त्यांची वैशिष्ट्ये तसेच वाहन विक्री व सेवा व्यवस्थापन यांची माहिती मिळावी, या उद्देशाने New Institute of Technology, Kolhapur च्या Institution’s Innovation Council (IIC) अंतर्गत ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग विभागाच्या वतीने माऊली ट्रकिंग प्रायव्हेट लिमिटेड, महिंद्रा बस अँड ट्रक डिव्हिजनचे अधिकृत शोरूम शिरोली येथे औद्योगिक भेटीचे आयोजन करण्यात आले.

या औद्योगिक भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना महिंद्रा कंपनीच्या विविध व्यावसायिक वाहनांच्या मॉडेल्सची प्रत्यक्ष पाहणी करण्याची संधी मिळाली. विद्यार्थ्यांना वाहनांची वैशिष्ट्ये, तांत्रिक बाबी, कार्यपद्धती तसेच शोरूममधील वाहन विक्री व ग्राहक सेवा प्रक्रियेची माहिती देण्यात आली.या औद्योगिक भेटीचे नियोजन ऑटोमोबाईल डिपार्टमेंटचे विभागप्रमुख प्रा. सुहासचंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. औद्योगिक भेटीसाठी प्रा. अभिजीत वालवाडकर , प्रा. शिवाजी कातवरे, प्रा. संजय दळवी व प्रा. सुदर्शन पाटील उपस्थित होते.
माऊली ट्रकिंग प्रायव्हेट लिमिटेडचे मालक हरीश पाटील सर तसेच त्यांच्या टीमने विद्यार्थ्यांचे स्वागत करून महिंद्राच्या विविध वाहन मॉडेल्सची सविस्तर माहिती दिली. वाहनांची वैशिष्ट्ये, कार्यपद्धती, उपयोगिता तसेच शोरूममधील विविध कार्यप्रणाली विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष समजावून सांगण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून विविध तांत्रिक बाबींबाबत प्रश्न विचारले.या औद्योगिक भेटीमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील तांत्रिक ज्ञानाचा प्रत्यक्ष उद्योगातील उपयोग समजून घेण्यास तसेच ऑटोमोबाईल क्षेत्रातील व्यावसायिक संधी व कार्यपद्धतीची ओळख होण्यास मदत झाली.
या उपक्रमास सन्माननीय डायरेक्टर डॉ. संजय दाभोळे सर यांचे मार्गदर्शन तसेच सन्माननीय चेअरमन डॉ. के. जी. पाटील साहेब यांचे मोलाचे प्रोत्साहन लाभले.




