कॅप्टन एस.जे.ईजिएकल रायफल स्पर्धेत तृप्ती चौगुलेने केली चार रोप्य पदकांची कमाई

कॅप्टन एस.जे.ईजिएकल रायफल स्पर्धेत तृप्ती चौगुलेने केली चार रोप्य पदकांची कमाई

कोल्हापूर (प्रतिनिधी): कॅप्टन एस जे ईजिएकल रायफल स्पर्धेत तृप्ती चौगुलेने चार रोप्य पदकांची कमाई केली.मुंबई येथे  3 मे ते 6 मे यादरम्यान महाराष्ट्र रायफल असोसिएशन तर्फे  29 व्या कॅप्टन एस. जे. ईजिएकल या स्पर्धा मुंबई वरळी येथे भरवण्यात आल्या होत्या.

त्यामध्ये दहा मीटर एअर रायफल वैयक्तिक या प्रकारात ड्रीम ओलंपियन शूटिंग अकॅडमीची रायफल शूटर खेळाडू तृप्ती अनिल चौगुले हिने सब युथ सोळा वर्षे आतील, युथ 19 वर्ष आतील, जूनियर 21 वर्ष आतील, आणि सीनियर 21 वर्षांवरील या चारही खेळ प्रकारात वैयक्तिकरित्या 400 पैकी 392 इतका स्कोर करून वरील चारही कॅटेगरीमध्ये चार रोप्य पदकांची कमाई करून महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरचे तसेच ड्रीम ओलंपियन शूटिंग अकॅडमीचे नाव केले.या यशाबद्दल तृप्तीवर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. तृप्तीच्या या यशाबद्दल वडील अनिल चौगुले व छत्रपती विकास सेवा संस्थेचे चेअरमन संजय चौगुले यांचे सहकार्य लाभले.